वसंत विचारधारा: महाराष्ट्राची विकासधारा

नवे आत्मभान जागृत करुन स्वावलंबनाच्या दिशेने कर्तृत्व घडवण्यात
सहाय्यभूत ठरणारी विचारधाराच व्यक्तीला, राज्याला अग्रेसर करणारी
ठरते. महाराष्ट्रात आज अनेक विचारधारा रुजलेल्या असताना महाराष्ट्र
आज कुठेतरी मागे पडत आहे. किंवा अपेक्षे एवढी झेप घेतलेली नाही. तेंव्हा
महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधायचाअसेल तर, नवे आत्मभान जागृत करुन
कर्तृत्व घडवीण्यात मोलाचे योगदान देणारी ‘वसंत विचारधारा’ अर्थात
‘NAIK THOUGHT’ चा अवलंब करायला का नको ? 1995
च्यानंतर महाराष्ट्राच्या सत्तारुढाकडे कुठे व्यापक व्हीजन आले नाही किंवा त्यांचे
प्रकल्प अपेक्षेएवढे यशस्वी ठरले नाही. महाराष्ट्राचा G.D.P किंवा E.R.
(ECONAMIC RATIO) अपेक्षेएवढे वाढीस नाही. सामाजिक
समृद्धी सामाजिक सुरक्षा वृद्धींगत होण्यापेक्षा आज भयावह अवस्था निर्माण
होत आहे. नाईक साहेबाच्या कारकिर्दीत सनमानाने जगणारा शेतकरी
आणि हरित अलंकाराने फुलणारी शेती आज दोनीही ओसाड बनत चालले आहे.
सत्ता विशीष्ट जाती. वर्गाकडे केंद्रीत होत आहे. त्यामुळे लोकशाही
सबलीकरणाच्या मार्गात मोठा अडथळा देशात व राज्यात निर्माण होण्याचे संकेत
दिसू लागली आहे. योग्य नियोजन आणि निर्णयक्षमते अभावी नाईकसाहेबाच्या
स्वप्नातला ‘सुजलाम-सुफलाम महाराष्ट्र’ आज ओसाडलेला बनत आहे.

या देशात व राज्यात आज पून्हा भांडवलवाद आणि जातीयशक्तीकडे संपूर्ण प्रणालीचा ओघ
जाण्याच्या वाटेवर आहे. एकंदरीत भयावह अवस्थेत आज महाराष्ट्र सापडलेला आहे. परंतु या
भयावह अवस्थेतून महाराष्ट्राला मूक्त करण्याचे सामर्थ्य केवळ एकाच
विचारधारेत आहे. ती विचारधारा म्हणजे ‘वसंत विचारधारा’ अर्थात
“NAIK THOUGHT’ वसंत विचारधारा ही नाईकसाहेबाच्या
कर्तुत्वतेजामधून उदयास आलेली एकविकासात्मक रसायन (Developing Chemical)

आहे. ‘महाराष्ट्र विकास पुरुष’ महानायक वसंतराव नाईक यांनी इतर विचारवंताप्रमाणे ग्रंथलेखन जरी केले
नसेल तरी मात्र त्यांच्या महान गौरवशाली कर्तृत्वाची पावती आजही जीवंत आहे.
त्यांचे विचार आणि कर्तृत्व महाराष्ट्राच्या हृदयात आजही जीवंत आहे. फक्त ती

आजपर्यंत विचारधारेच्या किंवा “Naik Thought’च्या रुपाने समोर आली
नव्हती. मी एकनाथ पवार (main Concepton of Naik Thought)जे काही विचार
महाराष्ट्रासमोर नव्याने पहिलयांदाच खवशरश्रेसू च्या स्वरुपात शात्रशुध्द
पद्धतीने आणत आहे. त्याचे अनेक संदर्भ पुरावे उपलब्ध आहे. बंजारा तांडा
वसाहती मधिल बुजूर्ग नायक आणि गणमान्य मंडळाकडून नाईक साहेबाचे
विचार मौखिकतेने पोहचलेले आहे. शिवाय नाईक साहेबाच्या अनेक
हृदयस्पर्शी आठवणी माझ्या कुटूंबियानी आजही जपलेल्या आहेत.
एवढय़ापूरतीच ही ‘वसंत विचारधारा’ सिमीत नाही तर खर्या अर्थाने वसंतराव
नाईकांचे कर्तृत्वच या विचारधारेचे मुळपाया (चरळप इरीश) आहे.
नाईकसाहेबाचे कर्तृत्वच ग्रंथापेक्षाही महान आहे.

ज्याप्रकारे एखाद्या ग्रंथामधून प्रेरणा मिळते,त्याच प्रकारे नाईक साहेबाच्या कर्तृत्वामधुन

देखिल प्रेरणा मिळते. त्यामुळे या विचारधारेला फ o ट ा ळ ण् य ा च ा त थ ा क   थ त ा न ाr .
प्रस्थापितानी प्रयत्न करता कामा नये. उलट महाराष्ट्राला
‘वसंत विचारधारा’ रुपाने नवी विचारधारा मिळत असल्याचे स्वागत

करणे समर्पक ठरेल. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि देशाच्या उज्ज्वल

भवित्याच्या योगदानासाठी ‘वसंत विचारधारा’ वृध्दीगत कशी होऊ शकेल, लोकप्रीय कशी ठरु शकेल यासाठी चिंतन

व प्रयत्न करणे राज्याच्या व समाजाच्याहितासाठी फलदायी ठरेल.
वसंत विचारधारा ही सत्ताविकेंद्रीकरण, हरितक्रांती, समाजवाद, दृरदृष्टी, परिवर्तन, लोकशाही
सबलीकरण आणि श्रमप्रतिष्ठा या मूलतत्वावर आधारलेली असल्याने या
विचारधारेचा पायाच भक्कम आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने वसंतराव
नाईक जन्मशताब्दी (2012-13) महोत्सव व ऐतिहासिक राष्ट्रीय ‘कृषी
वसंत’ या प्रदर्शनीच्या माध्यमातून नाईक साहेबाचे अनेक प्रेरणादायी पैलू
जनमाणसासमोर आले. पुरोगामी महाराष्ट्र शासन सध्याच्या काळात अनेक योजना
राबवीत असताना वसंतराव नाईकाची ‘पॉलीसी व व्हीजन’ चा अंगिकार करीत
असल्याची कबुली स्वतः मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित
पवार यांनी विविध विभागीय परिसंवाद व प्रदर्शनी कार्यक्रमात दिली, हे स्वागतार्ह
बाब आहे. परंतु वसंतराव नाईकाचे विचार किती प्रमाणात अंगिकारतात
त्यावर महाराष्ट्राचे विकासदेखिल अवलंबून राहील. कारण वसंत विचारधारा ही विकासाला प्रेरीत

करणारी, प्रगतीचे मार्ग दर्शविणारी (Naik Thought: The Way of Progress)एक प्रभावी
विचारधारा आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि देशाच्या उज्ज्वल
भविष्यासाठी सर्वसमावेशक असणारी वसंत विचारधाराच महाराष्ट्राला निस्पःक्ष
न्याय देऊ शकेल. महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचे मुलतत्वे वसंत विचारधारे ध्ये आहे. त्यामुळे वसंत विचारधारा ही महाराष्ट्राची एक लोकोत्तरविकासधारा आहे.

– एकनाथ पवार, साहित्यिक व समीक्षक
नागपुर, मो. 9850131368
(टिप:लेखक वसंतविचारधाराचे मुळसंकल्पक असून महाराष्ट्राच्या पटावर
अधोरेखित करण्यासाठी प्रयत्नरत आहे.)

Leave a Reply