वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेच्या जिल्हाध्यक्षपदी विनायक राठोड

2014-09-21_123543

सिंदखेडराजा (प्रतिनिधी) – वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेच्या बुलडाणा जिल्हास्तरिय समितीच्या जिल्हाध्यक्षपदी सिंदखेडराजा पं.स.चे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते विनायक ताराचंद राठोड रा.हनवतखेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागांतर्गत एका शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शसनाचे अवर सचिव किरण पांडुरंग वडते यांनी 10 जुलै 2014 रोजी केली. या आदेशान्वये विनायक राठोड हे पुढील 3 वर्षापर्यंत या समितीच्या अध्यक्षपदी कार्यरत राहणार आहेत. विनायक राठोड हे बंजारा समाजातील तरूण क्रियाशिल कार्यकर्ते असल्याने समाजाच्या उथ्थानासाठी या समितीच्या माध्यमातून त्यांना भरिव कार्य करता येणार आहे. बंजारा समाजाबरोबरच भटक्या विमुक्त प्रवर्गातील जवळपास 16 विविध जातीच्या तांडा/वस्ती सुधारासाठी ही समिती महत्वपूर्ण कार्य करणार आहे. राठोड हे आपल्या नियुक्तीचे संपूर्ण श्रेय बुलडाणा जिल्ह्याचे राकाँ. अध्यक्ष, 2 वेळा सिंदखेडराजा पं.स.सभापती, तथा विविध समित्यांवर आजपर्यंत भरिव काम केले आहे. आता जिल्हास्तरीय मोठय़ा महत्वपूर्ण समितीवर त्यांची निवड झाल्याने त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.