वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्रभर साजरी करा -ए.बी.चव्हाण

मुंबई (प्रतिनिधी) – भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेची राज्य कार्यकारीणीची बैठक दि. 14-06-2015 रोजी रविवारी ठाणे येथे पार पडली. सदर बैठकीत हरीत क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांची 102 वी जयंती मोठय़ा प्रमाणावर साजरी करावी असे ठरले. संघटनेच्या पदाधिकारी यांनी प्रत्येक तांडा, तालुका व जिल्हा सतरावर साजरी करावी. या साठी स्थानिक पातळीवर सर्व समाज बांधव व सामाजीक संघटनांना सहभागी करून घ्यावे. तसेच जयंती निमित्त निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा घेण्यात यावी, सामाजिक समस्या सोडण्यासाठी वैचारिक प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात यावे. गुणवंत विद्यार्थी यांचे गुणगान करण्यात यावे. सामाजिक जागृती निर्माण करण्यासाठी वसंतरावजी नाईक जन्मोत्सव सोहळा साजरा करावा. अशा प्रकारे वेगवेगळ्या वयाच्या गटामध्ये ही स्पर्धा घेण्यात यावी असे सर्वाच्या वतीने ठरवून वसंतरावजी नाईक जयंती महाराष्ट्रात साजरी करण्याचे ठरले आहे. तरी भारतीय बंजारा कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारीने सर्व महाराष्ट्रभर वसंतरावजी नाईक जयंती मोठय़ा थाटामाटात साजरी करावी असे आवाहन ए.बी.चव्हाण (महासचिव) यांनी केले आहे.