वसंतरावजी नाईक अधिकारी कम॔चारी संघटनेची आरक्षण विषयक महत्वपूर्ण बैठक

वसंतरावजी नाईक अधिकारी कम॔चारी संघटनेची आरक्षण विषयक महत्वपूर्ण बैठक आज अकोला येथे संघटनेचे अध्यक्ष अमर राठोड यांच्या अध्यक्षतेखाली संपन झाली .सदर सभेत पदोन्नती मधील आरक्षण रद्द करणारा निर्णय मॅटने दिल्याने निम॔ण झालेल्या अडचणींबाबत व यावर पुढील काय॔वाही करण्याबाबत औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निण॔याबाब सविस्तर माहिती देण्यात आली .अकोला युनिटने याबाबत कामाला लागण्याबाबत सूचित करण्यात आले.आरक्षणाची  ही लढाई आपल्याला लढून जिंकणे अत्यंत आवश्यक आहे कारण या लढाईवर आपले पुढील भविष्य अवलंबून असल्याचे अमर राठोड यांनी सांगितले व सदर लढ्यासाठी सव॔नी समोर यावे असे आवाहन त्यांनी केले .सभेला संघटनेचे कोषाध्यक्ष डॉ अरविंद आडे,सरचिटणीस जे.डी जाधव,अनिल राठोड,प्रा.रमेशराठोड,माणिक चव्हाण,उपायुक्त राठोड,प्रा.शेषराव चव्हाण,प्रा.विनोद राठोड,अशोक चव्हाण ,प्रेमदास राठोड,पंडित राठोड, उमेश चव्हाण ,उमेश आडे,यवतमाळ चे प्रा .सुभाष जाधव,रमेश राठोड ,गोरशिकवाडी चे राठोड आदी मान्यवर सह अनेक अधिकारी कम॔चारी उपस्थित होते .सभेचे सूत्रसंचालन व प्रास्तविक अनिल राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन उमेश यांनी केले .
image

Leave a Reply