लांबडी: कवी,एकनाथ गोफणे
|लांबडी
…………………………
हंगाम सरला
फुलली लांबडी
मंद मंद झुळुकावर
डोलली लांबडी….
तिचा बाणा स्वाभीमानी
पानं टोकदार
उंच झेप घेण्यासाठी
तिची आभाळी नजर….
मऊ सफेद झगा
अन, गुलाबी धुंदी
राना वनात फुलते
लांबडी ‘ स्वच्छंदी ‘
गोधन पुजे मध्ये
‘छोरी ‘ देते तीला मान
लांबडी गाते दोस्ता
ताठ जगण्याचं गान…
अशी फुलते लांबडी
अशी डोलते लांबडी
स्वच्छ सुंदर जगण्याचं
तत्व सांगते लांबडी…
✍ एकनाथ गोफणे: 8275725423
प्रमुख प्रतिनिधी: रविराज एस. पवार
ऑनलाइन बंजारा न्यूज पोर्टल
Website : www.GoarBanjara.com 8976305533
2 Comments
english
Gud