लढेंगे जितेंगे – मा. सुभाष तंवर

आज 5 Dec, 2017,याच दिवशी 1963 साली वसंतराव नाईक साहेबानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील बंजारा समाजासाठी ऐतिहासिक व गौरवाचा दिवस. खर म्हणजे या दिवसापासून बंजारा समाजाला न्याय व सन्मान प्राप्त होण्यास सुरुवात झाली. जेंव्हा आपल्या वा न्याय, हक्कापासून वर्षानुवर्षे वंचित राहिलेल्या समाजमधून कोणी मुख्यमंत्री सारख्या सर्वोच पदावर आसनस्थ होतो तो खरच त्या समाजासाठी खूप भाग्याचा व गौरवाचा षण. म्हणजे स्व. वसंतराव नाईक साहेबानी महाराष्ट्रात ज्या दिवशी राजकीय सत्ता हस्तगत केली तो 5 Dec 1963 हा खरा गौरवाचा दिवस जेथून खऱ्या अर्थाने बंजारा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिक उन्नतीच्या, विकासाला सुरवात झाली. नाईक साहेबाच्या याच कालावधीत खूप साऱ्या आश्रमशाळा समाजातील लोकांना बहाल करण्यात आल्या. खूप सारे अधिकारी वर्ग, पोलीस, व इतर शासकीय सेवे मध्ये उच्चपदावर नियुक्त झाले. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी बंजारा समाजाला निवास स्थान, वस्त्या, कॉम्प्लेक्स बहाल करण्यात आले. मुंबई मधील कुर्ला येथे नाईक नगर, मला माहित असलेली एक कॉम्प्लेक्स. मी स्वतः 20 महिने या कॉम्प्लेक्स मध्ये राहिलो आहे.
पण आजची या कॉम्प्लेक्स ची अव्यवस्था पाहता ज्या हेतूने नाईक साहेबानी ही जागा मुंबईत महत्वाच्या ठिकाणी समाजाला दिली तो गौरव समाजाने टिकवून ठेवला नाही ही खूप दुर्दैवाने म्हणावे लागते. जो राजकीय वारसा नाईक साहेबाने समाजाला 1964 साली दिला होता तो आज आपण टिकवून ठेवला आहे का याची समीक्षा करणे गरजेचे आहे.
25 जून 1991 साली पुन्हा महाराष्ट्राची राजकीय सत्ता स्व. सुधाकरराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजाला मिळाली. असे दोन जबर मुख्यमंत्री, ज्यांचा कार्यकाळ एक खंबीर, प्रखर, निर्भय नेतृत्व, कुशल प्रशासक म्हणून महाराष्टाच्या इतिहासात अजरामर राहील. असा राजकीय दृष्ट्या सोनेरी इतिहास देणाऱ्या बंजारा समाजाची आज महाराष्ट्रातील विधानसभा, लोकसभेमध्ये अस्तित्व नगण्य, शून्याबरोबर आहे. जे काही मान्यवर मंत्री, आमदार सध्या आहेत त्याचे स्वतःचे अस्तित्व असून नसल्यासारखे आहेत..समाज म्हणून तर विसराच.
ही जर वस्तुस्थिती आहे तर मग आज 5 Dec 2017,जो बंजारा समाज गौरव दिवस म्हणून साजरा करतो आहे त्याला आपण खरोखर, नाईक साहेबाच्या ऐतिहासिक राजकीय कर्तुत्वाला न्याय देतो आहे का?
मी म्हणेन बिलकुल नाही.
जर आपल्याला खऱ्या अर्थाने नाईक साहेबाच्या सोनेरी, ऐतिहासिक राजकीय कर्तुत्वाला न्याय द्यायचे असेल तर आपल्याला खालील गोष्टीवर काम करावे लागेल असे मला वैयक्तिक रीत्या वाटते;
1. सर्व सामाजिक संघटनांनी राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी एकत्र येणे.
2. एकत्र येउन एक राजकीय Politburo (5 लोकांचे शिष्टमंडळ) स्थापन करणे.
3. येणाऱ्या 2019 च्या निवडणुकीत एक खंबीर राजकीय भूमिका घेणे.
4. महाराष्ट्रातील 35 विधानसभा क्षेत्र जेथे बंजारा समाज मोठ्या संख्येने आहे तेथे सुशिक्षित, प्रामाणिक, दूरदृष्टी असणारा, नीतिमत्ता, विचारधारा असणाऱ्या नेत्याचा शोध घेणे व त्यामागे पूर्ण समाजाने(सामाजिक व आर्थिक दृष्टया) उभे राहणे.
5. नवनवीन नेतृत्व तयार करण्यासाठी Leadership कॅम्प, motivational कॅम्प घेणे.
6. Policy तयार करणे
7. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिक उन्नतीसाठी strategy व action plan बनविणे.
8. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील रहाणे

जोपर्यंत या गोष्टी आपण करत नाही तोपर्यंत गौरव दिन साजरा करणे म्हणजे स्वतःला किंवा समाजाला फसविण्यासारखे आहे असे मला वैयक्तिक रीत्या वाटते.
व हाच उद्देश घेऊन गोरबंजारा राजकीय परिवर्तन मंचची संकल्पना माझ्या डोक्यात आली.
आज 5 Dec, ज्या दिवशी स्व. वसंतराव नाईक साहेबानी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली या दिवसाचे पावित्र्य लक्षात घेऊन व या सोनेरी गौरव दिवसाचे औचित्य साधून, मी सर्व समाज व सामाजिक संघटनांनी एकत्र यावे व पुन्हा बंजारा समाजाला महाराष्ट्रात, संपूर्ण भारतात परत एकदा वैभव प्राप्त करून दयावे यांचे आव्हान, विनंती करतो.

*जय सेवालाल*
*जय वसंत*
*जय भारत*
*जय संविधान*

*सुभाष तंवर*
*गोरबंजारा राजकीय परिवर्तन मंच. (राजकीय विश्लेषक)*

*…….लढेंगे जितेंगे….*

Banjara Live