*राष्ट्रीय बंजारा परिषद आयोजित 10 वी /12 वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणी गोर बंजारा “पोलीस सन्मान सोहळा ” कार्यक्रम

जय गोर धर्म बोलो …गोर बंजारा ज्ञानपीठ चालो

*राष्ट्रीय बंजारा परिषद आयोजित 10 वी /12 वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणी गोर बंजारा “पोलीस सन्मान सोहळा ” कार्यक्रम ……*

*आदरणीय किसनभाउ राठोड अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परिषद* यांच्या मार्गदर्शना नुसार 1 जुलै 2019 रोजी दुपारी 12 वाजता गोर बंजारा ज्ञानपीठ, लोधवली,जुना मुंबई पुणे हायवे येथे दोन भव्य कार्यक्रम आयोजित केले आहे तरी नायक, कारभारी नसाबी व सर्व गोर बांधवांनी उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे

दरवर्षी प्रमाणे या वर्षीपण वर्षभर मेहनत घेऊन रात्रंदिवस अभ्यास करून *10/12 वी मध्ये चांगल्या मार्कांने उत्तीर्ण झालेल्या गोर बंजारा विद्यार्थ्यांचा सत्कार करणे आपले कर्तव्य आहे..*

*मुंबई कल्याण, ठाणे, नवी मुंबई ,पनवेल, पालघर* या विभागा मध्ये उच्च गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव कार्यक्रम करण्याचे आयोजन केले आहे.

*सद्रक्षणय खलनिग्रहणाय* या ब्रीद वाक्य नुसार पोलिस अधिकार आपले कर्तव्य बजवत असतात 24 तास 365 दिवस प्रति सेकंद कटाक्षाने आणि धाडसाने रात्र दिवस देशाची सेवा करता, आपल्याला आणि परिवार ला सुरक्षित ठेवतात पण स्वतः च्या परिवारची काळजी न घेता सणासुता मध्ये देखील कायदा व सुव्यवस्था कटाक्षाने अंमलबजावणी करतात .

Vasantrao Naik Jayanti Mumbai

आजच्या घडीला महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस चौकी असो या पोलीस स्टेशन असो किमान 4/5 गोर बंजारा पोलीस अधिकारी असतात मुंबई ठाणे, पालघर, नवी मुंबई, पनवेल मध्ये किमान 5000 पेक्षा जास्त गोर बंजारा पोलीस अधिकारी असण्याची शक्यता आहे . आज कित्येक वर्ष झाले असतील गावाकडून येथे येऊन वास्तव करत आहे आणि पोलीस ड्युटी पार पाडत आहेत. या सर्व पोलीस अधिकारी यांच्या *सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे*. या सर्व बाबीचा विचार करून मुंबई ठाणे, पालघर, नवी मुंबई, पनवेल मधील सर्व पोलीस अधिकारी यांचा भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात येणाऱ आहे

*एक पोलीस…….. एक लाख पोलीस……*

गोर प्रकाश राठोड
राष्ट्रीय प्रवक्ता
राष्ट्रीय बंजारा परिषद

Tag : Vasantrao Naik Jayanti, Gor Dharm Lodhivali, Lodhiwali, Ex CM Vasantrao Naik Jayanti