राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या वतीने,संत सेवालाल महाराज यांचा २७६वा जयंती महोत्सव उत्साहात साजरा

image

कल्याण,(प्रतिनिधी), सतिष राठोड
बंजारा समाजाचे अाराध्य दैवत संत श्री जगतगुरु संत सेवालाल महाराज यांचा,दर वर्षाप्रमाणे यावर्षीही १५ फेब्रुवारी ला २७६ वा जयंती महोत्सव संपूर्ण भारतभर बंजारा समाजबांधवानी अतिशय अानंदात साजरा केला.
           कल्याण शहरातील अंबिवली येथे,राष्ट्रीय बंजारा टायगर्स,कल्याण तालुका या सामाजिक संघटनेच्या वतीने संत सेवालाल महाराज यांचा २७६ वा जयंती महोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात अाला असुन,समाज बांधवांच्या समस्यांचा अाढावा घेण्यात अाला,तसेच समाजातील लोकांना जागृत करण्याचे काम अाजच्या तरुण पिढीने करावा, असे अावाहन समाज सेवक मा.अजय राठोड साहेब व कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेनेचे नगर सेवक मा.दशरथजी तरे साहेबांनी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.दशरथजी तरे,
प्रमुख अतिथी समाज सेवक मा.अजय राठोड (जि.प.ठाणे),अशोकभाऊ चव्हाण (प्रदेश सरचिटणीस-रा.बं.टा),संतोषभाऊ चव्हाण(मुंबई प्रदेशाध्यक्ष- रा.बं.टा),मा.सुदामभाऊ चव्हाण(ठाणे जिल्हाध्यक्ष- रा.बं.टा),मा.सतिष राठोड(कल्याण तालुकाध्यक्ष – रा.बं.टा),मा.डाॅ.अविनाश राठोड,डाॅॅ.युवराज राठोड,इ.पदाधिकारी उपस्थित होते.
          कार्यक्रम यशस्वितेसाठी-रा.बं.टा टिम-अंकुश जाधव,विष्णु नाईक,.तेजराव चव्हाण,वकिल राठोड,अनिल चव्हाण,भास्कर पवार,विकास पवार,इंदल चव्हाण,अंकुश जाधव,श्यामराव राठोड,दिलीप राठोड,विश्वनाथ पवार,अनिल चव्हाण,जगदिश जाधव,सौ.सुनिता चव्हाण,सौ.अनुसया चव्हाण,सुरेखा राठोड इ.कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

2 Comments
  1. Avatar
  2. Avatar

Leave a Reply