राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या शाखा उद्घघाटन
|बंजारा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी तरुणांनी आंदोलनात सहभागी व्हावे – आत्माराम जाधव
बंजारा समाजाला जर केंद्र सरकारच्या सवलती हव्या असतील तर समाजातील तरुणांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होणे आवश्यक असल्याचे राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्मारामभाऊ जाधव यांनी उजळोद ता. शहादा जि. नंदुरबार येथील राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या शाखा उद्घाटनच्यावेळी आवाहन केले.
यावेळी त्यांच्या हस्ते शाखेचे फलक अनावरण करण्यात आले तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज व रामदेवजी महाराजांच्या प्रतीमेचे पुजन क्रण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अड. अविनाश जाधव, राष्ट्रीय सरचिटणीस वाल्मिकभाऊ पवार, राष्ट्रीय कोशाध्यक्ष राजेश नाईक, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अशोक चव्हाण,बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष भारत राठोड, माजी जि.प.सदस्य ओंकार आबा जाधव, नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चव्हाण जळगाव जिल्हा उपाध्यक्ष सिताराम चव्हाण आदी मान्यवरांनी यावेळी समाजाला मार्गदर्शन केले.
The Great news of Rashtriya Banjara Tigers.thanks.