राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या मागणीला यश

  • *राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या मागणीला यश
    दि.२४/०७/२०२० रोजी राष्ट्रीय बंजारा टायगर्स घाटंजी यांनी केलेल्या मागणी नुसार पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराला हरितक्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री, यवतमाळ जिल्ह्याचे भूमिपुत्र कै.वसंतराव नाईक साहेब यांचे नाव व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला माजी मंत्री व थोर दानशूर व्यक्तिमत्व कै.आबासाहेब देशमुख पारवेकर यांचे नाव देण्याचा ठराव घाटंजी पंचायत समितीच्या सभागृहात एकमताने घेण्यात आला. कै.वसंतराव नाईक साहेबांच्या अतुलनीय योगदानाची माहिती संपूर्ण महाराष्ट्र राज्याला आहे.

दोन्ही महान नेत्यांचे नावं प्रवेशद्वाराला देण्याचा जो निर्णय पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला त्यांचे मनस्वी स्वागत आहे.

या महान नेत्यांचे नावं प्रवेशद्वाराला देण्याचा निर्णयामुळे त्यांच्या योगदानाची आठवण व स्मरण आजच्या व पुढच्या पिढीला सदोदित होत राहील. अशा प्रकारचे निवेदन प.स.गटविकास अधिकारी मॅडम व प. स.सभापती सौ.नीता आकाश जाधव यांना देते वेळी राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे जिल्हा अध्यक्ष अरविंदभाऊ जाधव,तालुका अध्यक्ष कैलासभाऊ राठोड,सचीव बंडूभाऊ जाधव,शहर अध्यक्ष संजय आडे, सुनील राठोड, रोडबाजी राठोड आदी मंडळी उपस्थित होते.