राष्ट्रीय गोर बंजारा नांदेड तर्फे नवदुर्गा उत्सवाची 25 सप्टेंबर रोजी स्थापना

नांदेड (प्रतिनिधी) – गेल्या वर्षाप्रमाणे चालुकेलेल्या नवदुर्गा नवरात्र उत्सवाला दि. 25 सप्टेंबर रोजी विवेकनगर येथे सुरूवात करण्यात येणार आहे. तरी राष्ट्रीय गोर बंजारा नवदुर्गा महोत्सवात नांदेड मध्ये स्थाहिक ह्या नवरात्र उत्सवात सहभागी होऊन आपल्या सर्व बंजारा महिलांना तिज उत्सावानंतर परत एकदा एकत्र येण्यासाठी सर्व महिलांच्या इच्छेनुसार ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व बंजारा महिला भगिनी व युवतीनी ह्या नवरात्रो उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे असे सौ.सुरेखाताई शेषराव चव्हाण, सौ.हाताई गोदाजी चव्हाण, सौ.लिनाताई वेगाजी आडे व सर्व नवदुर्गा उत्सव समितींच्या महिलांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.