रामजी नायक जाधव चितोडगड वंशवृक्षाची डहाळी

रामजी नायक जाधव चितोडगड वंशवृक्षाची डहाळी

भारतीय संघराज्यातील राजस्थान हे महत्वाचे घटक राज्य होय. पाकीस्तान सिमेला लागुन असलेला जैसरमेल हा वाळवंटी भुभाग, अजमेर, पुष्कर व जयपुर चा मारवाड प्रांत व उदयपुर, भिलवाडा, चितौंडगड हा मेवाडचा भुप्रदेश अशाप्रकारची राजस्थान ह्या राज्याचे भौगोलिक व स्वाभाविक प्रदेश आपली पौराणिक ओळख टीकवून आहेत. तसा मेवाड प्रांत राणाप्रताप जलाशयाने सुजलाम सुफलाम झालेला प्रदेश. याच प्रदेशातील 8 व्या शतकात बाप्पा रावल या सिसोदिया वंशातील पराक्रमी राजपुत्रास चितोडगड हा किल्ला लग्नातील हुंडय़ामध्ये मिळाला. रतनसिंग राठोड राजपुत वंशातील श्री संत मिराबाई ही कन्या. महाराणा प्रतापच्या शौर्याच्या कथा याच गडाने जतन करून ठेवल्या आहेत. संत मिराबाईच्या भक्तीचा व महाराणा प्रतापच्य शक्तीचा सुगंध याचचितौडगड किल्यावर आजतागायत दरवळतो आहे. भक्ती व शक्तीची ही भी येणार्या पिढय़ांची प्रेरणात्रोत आहे. राष्ट्रभक्तीची जाज्वल्य शाल भारतियांच्या हृदयात अखंड तेवत आहे. रावल राणा रतनसिंगची पत्नी पद्मिनीच्या व 15000 राजपुत महिलांच्या दि. 16/08/1303 जौहार बलीदानाने येथील रक्षा (विभुती) पवित्र झाली आहे. हे या बलीदानाचे दुःख झेलत चितोडगड उभा आहे. 14 व्या शतकातील (कंकाली) कालीका मंदिर वास्तुशिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. गडावरील विजय स्तंभ राजपुतांच्या यशाचे पोवाडे गात उभा आहे. याच चित्तोडगडावर इ.स. 1303 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने 30,000 हजार हिन्दुची साम्राज्य विस्तारासाठी कत्तल केली.

ही कहाणी चित्तोडगड सांगत आहे. राजपुताना मेवाडचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी प्राणाची बाजी लावुन राजपुत लढले हे स्वातंत्र्यगित व पराक्रमाचे पोवाडे गात चित्तोडगड उभा आहे. किल्ल्याचा घेर 12 कि.मी. असून समुद्र सपाटीपासून 1850 व समतल जमीनी पासून 400 फुट उंच आहे. गंभीरी नदी इतिहासाचेपोवाडे गात खळाळत वहाते आहे. मेवाडच्याभुमित पेरलेले राष्ट्राभिमान, राष्ट्रप्रे, अपार कष्ट, प्रामाणिक पणा, शौर्य पराक्रमाचे बीज या रक्ताने भिजलेल्या रानात असंख्या पटीने उगवले आहे. राजपुतान्यातला हा राजपुत्र भारताच्या कानाकोपर्यात उद्योग धंद्याच्या निमित्ताने बाहेर पडला आहे. कष्ट आणि फक्त कष्ट याच मंत्राने तो उपजिविकेसाठी धडपडला व उभा झाला आहे. शिल्पकला, शेती, नोकरी, हस्तकला, बांधकाम क्षेत्रातील कौशल्य संगमरवर, यंत्र सामुग्री, लाकडी अवजारे, हॉटेल व्यवसायामध्ये पैसे मिळवू लागला. प्रांताप्रांताची भाषा, जीवन शैली त्याने अवगत केली. परंतु सणउत्सव, मारवाडी, मेवाडी, बंजारा, भाषा ही त्याने जतन करून ठेवली आहे. राजस्थानाची होळी संपुर्ण जगात प्रसिध्द आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बीलक्लींटन परिवारासह रंगोत्सव खेळण्यासाठी राजस्थानात येवुन गेले असा हा रंगिला राजस्थान आपल्या अप्रतिम सांस्कृतिक ठेव्याने जगाला आकर्षित करतो आहे. किल्याचे सात दरवाजे, नगारखाना, पद्मिनी पॅलेस, छोटी-छोटी तळी, परिसरातील सोयाबीन, भुईwग, मक्का व ऊसाची शेती, किल्ल्यावरील बाभुळ व कडूनिंबाची झाडे, नवरात्री मध्ये भरणारी यात्रा सर्व कांही विहंगम आहेत. राजपुतान्यातील या राजपुत्राने आपल्या कष्टाने उभे केलेले हे राजस्थानचे रूप आहे. गडावरील महाराणा प्रताप यांचा पुतळा सदैव राष्ट्राभिमानाची प्रेरणा देत उभा आहे व बंजारांच्या इतिहासाची साक्ष देत चित्तोडगड उभा आहे. ‘मै बंजारा ले एक तारा घा भारत सारा’ या भटकंतीमधून बंजाराने – एक बंजारा गाये, हम सब जिनेवालो को जीने के राह बताये हा जिवण जगण्याचा मार्ग सर्व मानव जातिला दिला आहे. संपुर्ण देशातील विविध घटकराज्यामध्ये वास्तव्य करीत असलेल्या बंजारा समाजाचे मुळ वास्तव्य स्थान राजस्थानच होय. बंजाराचा इतिहासच मुळात चितोडगड येथून सुरु होतो व तो भारतात व शेजारच्या देशात एकरुप होतो. जाधव वंशातील पराक्रमी नायक रामजी जाधव मालोत यांचा वास्तव्यकाळ व लदेणी प्रवास चितोडगडापासून सुरु होतो.

इ.स. 1752 लदेणी भ्रंती काळ वैभवशाली होता. पराक्रमी रामजी नायक जाधव मालोत कुळाचा मुळ पुरुष. चितोडगड (मेवाड) येथील वास्तव्यानंतर उत्तर प्रदेशातील कन्नोज या राजधानीच्या ठीकाणी 754 कि.मी. अंतरु चालून रामजी नायक जाधव यांचा तांडा कननोज येथे पोहचला. कन्नोज हे जयचंद विजयपाल राठोड यांचे राजधानीचे ठीकाण अनंगपाळ ची मुलगी रुपसुंदरी ही जयचंद राठोडची आई होय व हरिषचंद्र मुलगा होय. राष्ट्रकुट, पलरा व गुर्जर पतिहार यांची काही काळ कनौजवर राजवट होती. इ.स. 1173 ते 1193 पर्यंत जयचंद राठोड ने 20 वर्षे कन्नौज वर राज्य केले. अशा ह्या ठीकाणी रामजी नायक जाधव यांचा तांडा कांही काळ वास्तव्यास होता. अत्यंत हुशार, चाणाक्ष व पराक्रमी रामजी नायकांने तांडय़ाचे नेतृत्व करुन भरभराटीस आणले. कन्नोज व परिसराची दळण वळणासाठीचे सुरक्षित मार्ग बाजारपेठेचा अंदाज, राजघराण्यासी जीव्हाळ्याचे संबंध व वाहतुक व्यापारातील चाणाक्षपणा इत्यादी गुणामुळे त्यांचा लदेणी व्यापार भरभराटीस आला होता. मालाची वाहतुक, करार मदार यासाठी त्यांना सदैव रपेट करावी लागे. कन्नोज उत्तरप्रदेश येथून रामजी नायक व तांडा महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराजवळील देवगिरी साठी मार्गस्थ झाला.

मध्य प्रदेशातील राजगड विद्यपर्वंत रांगतुन शाजापूर, देवास, इंदौर, खंडवा, सातपूडा पर्वत रांगेतुन देवगिरी येथे पोहचला अशा ह्या न्यायप्रिय, तांडा हित दक्ष रामजी नायकास जोगु व साधा नायक ही दोन मुले होती. साधा नायक यास बाळा व हापा दोन पुत्र होते. हापा नायक जाधव यांना धेना जाधव एकच मुलगा होता. परंतु धेना नायक यांना चिमणा जाधव, नथ्युसिंग जाधव व मानसिंग जाधव ही तीन मुले होती. मानसिंग नायक जाधव यास ताराचंद जाधव, देवसिंग जाधव, जोगुराम जाधव, सवाई जाधव व जेला जाधव ही पाच मुले होती. देवगिरी (दौलताबाद) येथील वास्तव्यानंतर त्यांचे वंशज बुलडाणा जिल्ह्यातील धामणगांव येथे वास्तव्यास होते. जेमला जाधव यांना बन्सीजाधव, खा जाधव ही दोन मुले व रुखमाबाई ही मुलगी होती. खा जाधव यांना सामा जाधव, धेना जाधव, बक्षी जाधव व फतु जाधव ही चार मुले होती. पैकी धेना जाधव हे बुलडाणा जिल्ह्यातील डोंगरखंडाळा येथे वास्तव्यास गेले व बक्षी जाधव हे वाशिम जिल्ह्यातील धु का येथे स्थायीक झाले. बक्षी जाधव यांचे जेष्ठ सुपूत्र मुन्ना जाधव शिर्ला नेमाने ता. खामगांव जि. बुलडाणा येथे वास्तव्यास आले उर्वरित परिवार धुका ता.जि. वाशिम (पुर्वीचा अकोला जिल्हा) येथे वास्तव्य करित आहे. मुन्ना जाधव यांना वसराम जाधव हा एकुलता एक मुलगा व दोन मुली उमरा व बोरमळी येथे वास्तव्यास होत्या. वसराम जाधव व गोलीबाई यांना सिताराम, शांताराम व सुभाष ही तीन मुले व दोन मुली आहेत पार्डी व झरंडी येथे दोन्ही मुली आपआपल्या कुटूंबात सुखाने राहत आहेत. सिताराम जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून अकोला येथे नोकरी करीत असून तेथेच हा परिवार स्थायीक झाला आहे. त्याचा मुलगा अमोल मानसोपचार तज्ञ या वैद्यकिय शाखेचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.

सिताराम जाधव व सुनंदा जाधव या उभयतांना अमोल जाधव सह ऋतिका ही मुलगी असून सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील राठोड परिवारातील अभियंता अविनाश सोबत तीचे लग्न झाले असून त्यांना पर्णवी ही दोन वर्षाची कन्या आहे. सौ. ऋतिका व अविनाश सध्या नौकरी निमित्ताने पुण्याला स्थायीक झालेले आहेत. सिताराम जाधव यांचा परिवार सुशिक्षित असून शांताराम व सुभाष हे दोन भाऊ शिर्ला येथे वास्तव्यास असून शेती करतात त्यांची ही मुले शिक्षण घेत आहेत. वसराम मुन्ना जाधव, श्री जयराम महाराज जंगल कामगार संस्थेचे अध्यक्ष आहेत. प्रामाणिक व इमानदार म्हणून ते परिचित आहेत. फत्तु जाधव नायगांव देशमुख येथे वास्तव्यास होते. त्यांचे जेष्ठ पुत्र अर्जुन कांही काळ आपल्या परिवारासह अडगांव राहेर येथे वास्तव्यास होते तेथुन ते नायगांव देशमुख येथे व वसराम जाधव शिर्ला ने ाने येथे राहावयास गेले. सतत भटकंती करणारा हा परिवार स्थायीक होवु लागला. पशुपालनहाच मुख्य व्यवसाय असल्यामुळे डोंगर व जंगला लगत नागरी वस्ती पासून एक ते दोन कि.मी. अंतरावर प्रामुख्याने पश्चीम दिक्षेस कच्च्या झोपडय़ा करून जीवंत पाणवठय़ा जवळ यापरिवाराने वस्ती केली. बंजारा समाजाचे आद्य समाज सुधारक महान संत श्रीसेवालाल महाराजांनी आपल्या उपदेशाद्वारे प्रबोधन केले. मुळ लदेणी व्यापार बंद पडल्यामुळे समाज बांधवानी इतर समाजाकडून शेती कशी करावी हे शिकुन घ्यावे व शेती करण्यास सुरूवात करून उपजिवीका करण्याचा संदेश दिलेला होता.

बहुतांश समाजबांधवानी शेती विकत घेतली कांहीनी भाडे पटय़ावर शेती करण्यास प्रारंभ केला. फत्तुजी जाधव यांनी नायगांव देशमुख ता.मेहकर जि.बुलडाणा येथे त्या काही दहा एकर शेती विकत घेवून भुस्वामी होण्याचा पहिला मान प्राप्त केला. व खर्या अर्थाने नायगांव देशमुख येथील बंजारा समाजातील पहिले शेतकरी म्हणून शेती कसण्यास सुरूवात केली. त्यांना अर्जुन, वालु, लक्ष्मण व गोबरा ही चार मुले व झीपी बाई व मोती बाई ह्या दोन मुली होत्या. झीपी बाई व मोतीबाई यांचा गावंडगांव ता.पातूर येथे चव्हाण (केळुत) व राठोड परिवाराच्या रूपाने वंश विस्तार झाला तर जेष्ठ पुत्र अर्जुन यांना दगडु व जगराम ही दोन मुले व मंगलीबाई व गुजरीबाई ह्या दोन कन्या होत्या त्यांचाही अनुक्रमे शेकापूर येथील नरसिंग खे ा राठोड परिवार व बोडखा ता.पातुर येथील फुलसिंग थानु. राठोड परिवाराचा वंश विस्तार झाला. दगडु जाधव व जगराम जाधव दिर्घकाळ पर्यंत एकत्र कुटूंबात राहत होते. नंतर ते विभक्त झाले. जगराम जाधव यांनी पुढे वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेवून पंढरीची वारी केली. वैष्णव पंथाची दिक्षा घेवून किर्तन प्रवचनात ते आपला वेळ घालवु लागले.

समाज प्रबोधनासाठी उत्तर आयुष्यात त्यांनी दैनिक रामधुन फेरीमधुन मांगल्याचा वसा चालु ठेवला. उदेभान बोराडे व इत्र माळकरी भक्ता सोबत त्यांचा ह्या दिनक्रमाने आयुष्याची संध्याकाळ झाली. मासाहार वर्ज्य करून शाकाहारी जीवन ते जगले. त्यांच्या ह्या निस्वार्थ व प्रामाणिक वृत्तीमुळै नायगांव देशमुखचे सतत दहा वर्ष उपसरपंच होण्याचा मान त्यांना मिळाला. देऊळगांव साकरशा ते नायगांव देशमुख ह्या जोडरस्त्याचे कामात त्यांनी घेतलेली न्यायपुर्ण भुमिका ही त्यांच्या कार्याची जमेची बाजु होय. विष्णु व हरिद्वार ही त्यांची दोन मुले, गौकर्णा, अन्नपुर्णा व अनुराधा ह्या तीन मुली आपआपल्या संसारात मग्न आहेत. गौकर्णाचे निधन झाले. पार्थ हा तीचा मुलगा पुण्यात राहतो. वाळु जाधव हे फत्तु जाधव यांचे द्वितीय चिरंजीव वाळु जाधव व तोळका बाई यांना वाच्छु जाधव एक पुत्र तर चोखली व कोलीबाई या दोन मुली आहेत. वाच्छु जाधव आपल्या मुलाबाळा व नातवंडासह विठ्ठलवाडी येथे राहतात. लक्ष्मण जाधव हे फत्तु जाधव यांचे तृतिय पुत्र लक्ष्मण जाधव व सुवाबाई यांनासिताराम व मदन ही दोन मुले व शेवली बाई ही एकुलती कन्या देऊळगांव साकरशा येथे राठोड परिवारात मुले व नातवंडात राहते. गोबरा जाधव फत्तु जाधव यांचे चवथे पुत्र गोबरा जाधव व बत्तासीबाई यांना मोहन हा एकुलता पुत्र बदली बाई, सोली बाई व गिता ह्या तीन मुली आपआपल्या परिवारात गुन्या गोविंदाने रातात सोलीबाई तुळशिराम राठोड गावंडगांव येथून नायगांवला वास्तव्यास आहेत.

अर्जुन जाधव व पिंपळाबाई यांचे जेष्ठ पुत्र दगडू जाधव कष्ठाळु व प्रमाणिक होते. त्याकाळी शिक्षणाची सोय उपलब्ध नव्हती म्हणून त्यांनी चतरू नामक खाजगी शिक्षकाकडे दोन महिने इयत्ता पहिलीचे शिक्षण घेतले. अल्पशा शैक्षणिक काळात त्यांनी वाचन, लेखन, उजळणी, महाराष्ट्र व भारताचा भूगोल जमाखर्च लेख, पंचाग व ज्योतिष्य शात्राचा सखोल अभ्यास केला होता. आजची शिक्षण पध्दती व त्याकाळाची शिक्षण पध्दती पाहिली म्हणजे लक्षात येते की, आपण कोठे आहोत. शेलगांव देशमुख ता.मेहकर जि.बुलडाणा येथे वसंतराव नाईक निवडणुक प्रचारासाठी आले असतांना त्यांच्याशी बंजारा समाजाच्या समस्या बाबत संवाद केला होता व नाईक साहेबांनी सुध्दा त्यांची आस्थेने विचारपुस केली होती. वसंतराव नाईकांबध्दल त्यांना नितांत आदर होता. गाडगे बाबांचा श्रमाचा वसा त्यांनी घेतला गुराढोरांचे शेण पाणी गाई म्हशी दोहणे ही त्यांची दिनचर्या प्रातकाळी 4 वाजता त्यांची दिनचर्या सुरू होई. श्रमावर अपार श्रध्दा असल्यामुळे व शैक्षणिक दृष्टीकोण असल्यामुळे आमच्या वाटय़ाला सोन्याचे दिवस आले आहेत. ‘हाती धरूनि झाडु तू मार्ग दाविलासी स्पर्शे तुझ्या महात्म्या ही थोरवि श्रमासी’ श्रमाची थोरवि त्यांनी आपल्या कृतितून दाखविली. दगडू जाधव व देवलाबाई जाधव यांना जयसिंग हा एकुलता मुलगा व पारूबाई कन्या ही दोन अपत्ये आहेत. पारूबाई देऊळगांव साकशी येथे सुगन हरदास राठोड परिवाराची सद्सय आहे. स्वकष्टाने राठोड परिवाराने ‘श्री सेवा गृह उद्योग’ उभा केला आहे.

आज हा उद्योग भरभराटीला आला आहे. जयसिंग जाधव उच्च शिक्षण घेऊन प्राचार्य पदावरून नुकतेच निवृत्त झाले आहेत. जयसिंग जाधव व प्रमिला जाधव यांना उमेश व गोपाळ ही दोन मुले असून उषा ही मुलगी आहे. जयसिंग जाधव परिवाराची तीनही अपत्ये उच्च विद्याभुषित असून उमेश यांत्रीक विषयात एम.ई.पदव्युत्तर असून अभियांत्रीकी महाविद्यालय उस्मानाबाद येथे सहयोगी प्राध्यापक आहे. गोपाल जाधव एम.एस्सी.बी.एड असून कनिष्ठ अधिव्याख्याता आहे. मुलगी उषा जाधव शिक्षणशात्रात पदव्युत्तर एम.एड.आहे. उमेश व आश्विनी जाधव यांना पृथ्वी ही दोन वर्षाची मुलगी असून रामजी नायक जाधव यांच्या तेराव्या वंशवृक्षाची डहाळी आहे. अश्विनी ही इंगलवाडी निवासी बदुसिंग राठोड या सुसंस्कारीत व संपन्न परिवारातील पंजाबराव राठोड यांची सुकन्या असून जाधव परिवाराची स्नुषा व उमेश जाधव यांची सुविद्य पत्नी असून तीने एम.ए.हिन्दी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. रामजी नायक जाधव या वंशवृक्षाचा विस्तार नायगांव देशमुख, शिर्ला नेमाने, विठ्ठलवाडी, डोंगरखंडाळा, धुका, इसवी, राजगड, डोंगर किन्ही, गावंडगाव, पातुर व अकोला येथपर्यंत पसरलेला आहे. ज्ञान असलेली माहिती व कितीतरी पटीने अज्ञात असलेली म ा ह त ाr इ त ह ा स ा ल ा ठावुक आहे. कालौघात तीचे संकलन करता आले नाही. मात्र एक बाब स्पष्ट आहे की, या परिवाराच्या पुर्वजांचा प्रवास, चित्तोडगड, कन्नोज व देवगिरी या तत्कालीन राजधानीच्या ठीकाणावरूनच झालेला आहे. त्यावरून त्यांच्या लदेणी व्यवसायाचा व्यापारी संबंध राजघराण्यासी आल्याचे जाणवते. राणा प्रतापच्या जाज्वल देशाभिमाने व बंजारांच्या ईतिहासाने पुनित झालेली चित्तोडगडची भी आबाल वृध्दांच्या मनात देशप्राचा स्फुलींग कायम चेतवित राहीली आहे. “इस मिठ्ठीसे तिलक करो यह धरती है बलीदान की” ह्या कवी प्रदिपच्या काव्यपंक्ती सदैव कानात निनादत असतात. परिवाराच्या पुर्वजांना विनम्र अभिवादन !

प्राचार्य जयसिंग द.जाधव
मु.पो.ता.पातुर जि.अकोला
मुळ निवास – नायगांव देशमुख,
ता.मेहकर जि.बुलडाणा (महाराष्ट्र)
मो. 9923482062.

संकलन
सुरेश विजयसिंग जाधव भाट
मु.पो.ता.किशनगड
जि.अजमेर (राजस्थान)

Tag: Banjara Gor Banjara Goar,  Lamani, Lambani, Bazigar