या अत्याचारा विरुद्ध समाज का एकत्रित येत नाही ?

गोर बंजारा समाज हा महाराष्ट्रातील 36 जिल्हयात वास्तव्याला असून त्यांची लोकसंख्या एक कोटीच्या आसपास आहे,गेली अनेक वर्षे हा समाज शासनाच्या विविध सोयी,सुविधा व योजनांपासून दूर आहे,त्यातच हया समाजावर गेल्या वर्षभरात मानवी मूल्यांना तडा देणारी व मानवी वृत्तीला काळीमा फासणा-या काही वारंवार घटना घडल्या आहेत.
1) तावरजखेड ता.जि.उस्मानाबाद येथील गोर बंजारा तांडा वस्तीला आग लावण्यात आली.
2) जिवती,जि.चंद्रपूर येथे पोलीसांनी आकस ठेवून सुडापोटी गोर बंजारा महिलेला अमानुष
मारहाण केली व त्यांच्यावर अन्यायकारक गुन्हे नोंदवण्यात आले.
3) नारळी कुरळी ता.उमरखेड,जि.यवतमाळ येथील जवळपास 150 च्यावर गोर बंजारा
बांधवांवर अट्रॉसिटी दाखल करण्यात आली.
4) पोखरी,ता.महागांव,जि.यवतमाळ येथील अल्पवयीन गोर बंजारा मुलीवर बलात्कार करून
तीचा खून करण्यात आला.
5) सांगवी जि.नांदेड येथे दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला.
6) पांग्रा बंदी ता.मालेगांव जि.वाशिम येथे गोर बंजारा बांधवांवर अत्याचाराची घटना घडली.
ईतर ठिकाणी घडवण्यात आलेल्या अमानवी अत्याचारांच्या घटनांचा आम्ही तीव्र नीषेध करतो,पीडितांना न्याय आणि दोषींना कठोर शिक्षा मिळेपर्यंत आम्ही मा.मुख्यमंत्र्यांकडे याचा पाठपुरावा करतोय,समाजाला न्याय मिळवून देणे माझे कर्तव्य आहे,बंजारा समाजाचा सैनिक म्हणून मी कर्तव्य पार पाडीत आहे.

ना.संजय राठोड