याडी, माता, आई , माँ व मम्मी हे शब्द‎ ऐकताच मनात प्रसन्न होतो. या विषयीच थोड़ काई …!

मित्र हो आज Mother’s day कामा निमित्त गावा बाहेर असल्या मुळे आईला आजच्या दिवसी भेटू शकत नाही. तरी पण आई नेहमी माझ्या हृदयात राहते. मला आपल्या आई वडीला विषयी खुप अभिमान आहे. मि जे काई करत आहे फक्त त्यांना सुखी ठेवण्यासाठी. आज पण मला माझ्या लहान पणीची आठवन येते. कारण माझ्या आई वडीलांनी जे काई माझ्या साठी केल ते माझ्या साठी नेहमी प्रेरणादायी ठरत आहे. कारण त्यांची गरीबी व त्यांची मेहनत, त्या वेळेचे त्यांचे विचार आज पण मला चांगले विचार करण्यास भाग पाडते. कारण मि लहान असतांना माझ्या आई वडीलांनी जे दुख भोगलय ते मि नेहमी आठवन करून त्यांना सुखी ठेवण्याची जिद्दच माझ्या अंगी ठेवलेली आहे.कारण माझ्या साठी त्यांनी खरोखर खुप कष्ट केल आहे. मला उपाशी पोटी न झोपवता ते स्वता उपाशी राहून माझ्या पोटात अन्न टाकणारे तेच माझे आई वडील. खरो खर माझ्या साठी नेहमी प्रेरणादायी राहतील व माझे खरे सिल्पकार मि त्यांनाच मानत आलोय. आज त्यांनी जर माझ्या अंगी चांगल्या संस्काराचा पाया घातला नसता तर मि काय राहिलो असतो हे मलाच माहित नाही. कारण जगात दुख सहन करून आपल्या पाल्यांना सुखी ठेवनारे फक्त आई वडीलच असतात. मित्र हो जगात जर देव असेल किंवा तुम्ही देवालयात(मंदिर) जात असाल तर पहिले आई वडीलांची पुजा करा…व नेहमी आई वडीलांचा आदर करा, त्यांना जे पाहिजे ते आनून द्या,वेळेवर त्यांची काळजी घ्या,त्यांना शब्दाने दुखवू नका,कामा निमित्त बाहेर गावी असाल तर दर रोज दिवसातून एक वेळा फोन करून त्यांच्या तबेती विषयी विचारा,त्यांना नेहमी हसत्या चेहऱ्याने बोला, त्यांना आपल्या जवळून हिच आपेक्षा आहे. नंतर बघा आई वडील किती खुश राहतात.तुम्हाला देव कूठेही मिळनार नाही. देव मिळेल फक्त आई वडीलांन मध्ये….
धन्यवाद…

गोर कैलास डी राठोड.
स्वयंसेवक गोर बंजारा संघर्ष समिति भारत,

image

सौजन्य :- गजानन डी. राठोड
चिफ एडीटर :- बंजारा न्युज ऑनलाईन पोर्टल
वेबसाईट  :- www.goarbanjara.com
संपर्क‎ :- ९६१९४०१३७७

Leave a Reply