मुंबईट उप जिल्हाधिकारी रविन्द्र राठोड़ आणि राजू नायकचे जाहिर सत्कार

IMG-20160421-WA0000

IMG-20160421-WA0002

मुंबई:  बृहनमुंबई महापालिका कर्मचारी व मुंबई परिसरातील सर्व बंजारा बांधव यांचा संयुक्त विद्यमानाने दादर येतील धुरु सभागृहात नव निर्वाचित उपजिल्हाधिकारी रविन्द्र राठोड़  आणि अखिल भारतीय बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पदी  मा.राजुसिंग नाईक यांची  निवड झाल्याबद्दल बृहनमुंबई म.न.पा. कर्मचारी व मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातील गोर-बंजारा  बांधव यांच्या वतीने मा.बी.जी.पवार साहेब उप आयुकत म.न.पा. यांच्या उपस्थितीत  जाहिर सत्कार करण्यात आले.या प्रसंगी बंजारा तरुणाचे प्रेरणा स्थान ठरलेले रविन्द्र राठोड़ मणाले. कितीही वाईट परीश्तीती असली तरी इच्छा असेल तर काहीही साद्ध्य होऊ शकते.तर राजू नाईक म्हणाले समाजासाठी बाहेर या आणि सामाजिक लढा उभारा असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. या ठिकाणी गायक श्रीकांत पवार, डॉ. राम चव्हाण, मंगल चव्हाण, गोर सेनेचे अध्यक्ष संदेश चव्हाण, सेवालाल फौंडेसनचे अध्यक्ष गोविंद राठोड, सामाजिक कार्यकर्ते राजेश चव्हाण, आणि पत्रकार रवी चव्हाण उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. संतोष राठोड यांनी केले.

 

गोविंद राठोड
संपादक,www.goarbanjara,com

 

Tag: youngest banjara dpt. collector….