मा. मदनभाऊ जाधव यांचा १४ मे रोजी ४५ वा वाढदिवस सोहळा आनंदाने साजरा करण्यात येणार

श्री. सतिष एस राठोड ✍

  • जामनेर :- मा. मदनभाऊ यांचा अल्प परिचय त्यांचा जन्म दि. १४-०५-१९७४ रोजी गोद्री तांडा, तालुका – जामनेर, जिल्हा – जळगांव येथे झाला. बालपणापासूनच त्यांना समाज सेवेची आवड असल्यामुळे शालेय शिक्षण घेत असतांना समाज सेवा काय असते, तसेच समाज सेवा कश्या प्रकारे करावी यावर वरिष्ठांकडून माहिती घेऊन त्यावर अंमल बजावणी करण्यात सुरुवात करायचे.

त्यांचे शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण जामनेर व बोदवड येथे पूर्ण झाले. लहानपणापासूनच खेळाची आवड व नियमित व्यायाम करणे हे एक त्यांच्या अंगी झोपासले आहेत. राज्य स्तरावर कबड्डी या खेळाचे कर्णधार म्हणून अतियशय उत्कृष्ट अशी कामगिरी केली असून उत्कृष्ट खेळाडू म्हणून नावलौकीक आहेत. शिक्षण घेत असतांना NSUI चे प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यभार सांभाळले तसेच विविध संघटनेतही सामाजिक काम करत होते. सद्या बंजारा समाजासाठी १०-१२ राज्यात उत्तम अशा प्रकारे काम करणाऱ्या राष्ट्रीय बंजारा टायगर्स या संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.

  • मुंबई सारख्या शहरात नौकरी निमित्ताने आल्यानंंतर, नौकरी सोबतच बंजारा समाजाच्या व्यतिरिक्त इतर सामाजिक संघटनेत काम करत आहेत. तसेच बंजारा समाजात प्रमुख असा सांस्कृतिक सण ” तिज उत्सव ” म्हणून मानला जातो. महाराष्ट्रात नव्हे तर देशात अव्वल दर्जाचे असे ” तिज उत्सवाचे कार्यक्रम” घेऊन ” तिज उत्सवाचे केंद्र बिंदू ” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण (ठाणे) या शहराची ओळख निर्माण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. भारतात नंबर एकची तिज उत्सव कल्याण या शहरात साजरा करण्यात येते. त्यात कर्मचारी तसेच अधिकारी सहपरिवार या तिज उत्सवामध्ये मोठ्या आनंद उत्साहाने हजारोंच्या संख्येने सहभाग घेतात. कल्याण येथील तिज उत्सव कृती समितीचे मा. मदनभाऊ हे खजिनदार, सचिव तसेच गेल्या १० वर्षांपासून अध्यक्ष आहेत.

दिवस असो की रात्र नेहमी दुसर्यांना मदत करण्याची भावना ठेवणारे असे उदार वादी म्हणून त्यांची ओळख आहे.

  • मा. मदनभाऊ जाधव यांना मिळालेले पुरस्कार

कृषी मेळाव्यात नाशिक येथे प. पू. गुरुमाऊली यांच्या हस्ते पुरस्कार व आशिर्वाद.
मुस्लिम समाजाकडून बंजारा समाज रत्न पुरस्कार.
मराठा समाजाकडून बंजारा भूषण पुरस्कार.
स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार.
असे अनेक पुरस्कार मा. मदनभाऊ जाधव यांना मिळालेले आहेत.