मासा वर्ल्ड फाऊंडेशनचा स्पोर्ट पुरस्कार प्रदीप दिवानसिंग जाधव यांना जाहीर

श्री. सतिष एस राठोड ✍

मुंबई:- मासा वर्ल्ड फाऊंडेशनच्या माध्यमातून जाहीर झालेला पुरस्कार मासा इंडिया मेंटॉर MENTOR पुरस्कार २०१९ सोशल आणि स्पोर्ट या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिला जातो. यावर्षी स्पोर्ट क्षेत्रात चांगली कामगिरी केल्याबद्दल बुलढाणा जिल्ह्यातील प्रदीप दिवानसिंग जाधव यांना जाहीर जाहीर करण्यात आला असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे .

पुरस्कार वितरण सोहळा २ जून रोजी दिल्ली येथे होणार असून या पुरस्कारांमध्ये येणारे वेगवेगळ्या मोठ-मोठ्या थोर व्यक्तींमध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या छोट्या खेडेगावातल्या प्रदीप जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच प्रदीप जाधव यांचे मुख्याध्यापक निलेश नायडू सर व उपमुख्याध्यापक रूपेश रावलेलू, पुणे जिल्हा), जाबेर पठान, योगेश काकफळे ,हरी बोरडे. शिक्षक वर्ग यांनी गर्व असल्याचे व्यक्त केले आहे. प्रदीप जाधव खूप मोठा हो कीर्तिवान हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना या शिक्षक वर्गाने केली आहे.

पुण्यामध्ये शिकतांना प्रॅक्टिस करत असतांना अनेक संकटांना, समस्यांना सामोरे जाऊन यशस्वी होण्याचा मार्ग स्वतः शोधला आहे.

Leave a Reply