मातंग समाज राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद सामाजिक कार्यकर्ते सचिन राठोड चा केला सन्मान

नांदेड (प्रतिनिधी) – समई प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक क्षेत्रात संभाजीराव मंडगीकर, पत्रकारीता क्षेत्रातील भातर दाऐल, सांस्कृतिक क्षेत्रातील जु.जॉनी लिव्हर रामेशर भालेराव, शिक्षण क्षेत्रातील शिवा कांबळे, साहित्य क्षेत्रातील प्रा. विठ्ठल भंडारे व उद्योग क्षेत्रातील शंकर कांबळे, यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मानपत्र सन्मानचिन्ह देवुन गौरव करण्यात आले. नांदेड – समई प्रतिष्ठान वतीने मातंग मसाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा रविवारी येथील वामनराव पावडे मंगल कार्यालयात पार पडला. या वेळी महाराष्ट्रातील 260 वधुवरा ंनी सहभाग घेवुन आपला परिचय करुन दिला.2015-02-11_102530 त्यापैकी पाच जणांचे विवाह या ठिकाणी जुळले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही.जे. वरवंटकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन जि.प. अध्यक्षा सौ. मंगलाताई आनंद गुंडले, स्वगताध्यक्ष मारोती वाडेकर, के.मुर्ती, उफाडे, एन.जी. कांबळे गणेश तादलापुरकर, लालबा घाटे, आदिचीं उपस्थीती होती. यावेळी बोलताना डॉ. गादेकर म्हणाले मातंग समाजवार शैक्षणिक राजकीय आर्थिक प्रगतीसोबत आपला मुलांचे भविष्य घडविण्याची मोठी जबाबदारी आहे. आजच्या धकाधकीच्या जवीनात योग्य जोडीदार मिळणे अवघड झाले आहे. त्यासाठी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करणे काळाची गरज आहे असे आनंद गुंडले यांनी मातंग समाजासमोर आज अनेक प्रश्न उभे आहेत. त्यासाठी आयुष्य सुखाचे जाण्यासाठी व समाजाचे हित जोपासण्यासाठी त्याला योग्य जोडीदार मिळणे आवश्यक असल्याचे सांगीतले. लवकरच मातंग समाजाचा सामूहीक विवाह मेळावा आयोजित करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. स्वागताध्यक्ष वाडेकर म्हणाले आज प्रत्येक पालकांसमोर आपल्या पाल्याला जोडीदार निवडताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. मुले शिक्षण घेवुन मोठे झाले परंतु त्यांना त्यांच्या मनासारखे स्थळ मिळत नाही व त्यामुळे आपल्या मुलांना वाढत्या वयाची चिंता सोबत घेवुन पालकांची ससेहोलपट होताना दिसत आहे. मेळाव्याचे आयोजक तथा समई प्रतिष्ठाणचे अध्यक्ष श्री बालाजी करंडकर म्हणाले अलिकडे वाढत्या माहागाईwळे गोरगरीबांना हुंडा देणे शक्य होत नाही त्यामुळे त्यांचा ही कोंडमारा होत आहे अशा परिस्थतीत वेळ पैसा व श्रम वाचविण्याचा वधु-वर परिचय मेळाव्याची समाजाला गरज आहे ही अडच्ण लक्षात घेवुनच समई प्रतिष्ठान हा उपक्रम हाती घेतला आहे. सोहळ्यात राज्यातील शंभराहुन अधिक वधु-वरांनी परिचय करुन दिला. प्रास्ताविक व सुत्रसंचालन चंद्रकांत मेकाले व बालजी गवाले यांनी केले. तर आभार आयोजक तथा समई प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालाजी करंडकर यांनी उपस्तितांचे आभार मानले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी को ल इंगोले, रेखा आठवले, प्रतिप पाईकराव, विजय जांबळीकर, सचिन गायकवाउ, प्रविण करंडकर, पप्पु अंबच्चार, शंकर मडावी आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply