मांडवी मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा आरक्षीत करा -नंदाताई पवार

मांडवी (प्रतिनिधी) – मांडवीच्या मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे गेट नादुरूस्मत असल्यामुळे धरणातील पाणी वाया जात आहे. जर त्याची त्वरीत दुरूस्ती न झाल्यास प्रकल्पातील पाणी वाया जाऊन मांडवी शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार असल्याने त्याची दुरूस्ती करून पाणी साठा आरक्षीत करा, अन्यथा लोकशाही दिनापासून आमरण उपोषण करू, असा इशारा जि.प.सदस्या सौ.नंदाताई धनलाल पवार यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिला आहे. मांडवी बृहत प्रकल्पातील आजमितीस पाणीसाठा अपूर्या पावसामुळे कमी आहे.त्यातच कालव्यात सोडण्यात येणारे पाणी गेट नादुरूस्त झाल्याने रोज मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा अपव्य होत आहे. या प्रकल्पातील पाणी नळजोडणीद्वारे मांडवी शहराला पुरविल्या जाते. जर हे गेट लवकर दुरूस्त न केल्यास रोजच्या पाण्याच्या अपव्यामुळे उन्हाळ्यात पाणी शिल्लक राहणार नाही, परिणामी शहराला पाणी टंचाई भासणार. परिसरातील जनावरांसाठी पाणी उपलब्ध राहणार नाही, अशी गंभीर समस्या उद्भवणार आहे. या गेटच्या दुरूस्तीसाठी अनेकदा मागणी करण्यात आली पण पाटबंधारे विभागाला अद्याप जाग आली नाही. त्यामुळे आता खुद्द जि.प.सदस्या तसेच जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती नांदेडच्या सदस्या सौ.नंदाताई धनलाला पवार ह्या आक्रमक झाल्या असून त्यांनी या गेटची त्वरीत दुरूस्ती करा, अन्यथा लोकशाही दिनापासून आमरण उपोषण करण्याचा इशारा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. मांडवी जिल्हा परिषद सर्कलमध्ये उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार नाही पण आपण योग्य ती पर्यायी व्यवस्था करत टँकर किंवा नळ योजनेचे नियोजन करून पाणी टंचाईवर मात करत लोकांनीही यासाठी सहकार्य करावे व या भागातील तलाव, बंधारा यातील पाण्याचा उपसा थांबवून पिण्यासाठी राखी ठेवावा, असे आवाहन सौ.नंदाताई पवार यांनी सा.बंजारा पुकारच्या प्रतिनिधीशी बोलतांना केले.

Leave a Reply