महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा बाबा अामटे प्रेरणा पुरस्कार २०१८ कर्मवीर दादा इदाते यांना जाहीर

( श्री.सतिष एस राठोड )

मुंबई :- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा बाबा अामटे प्रेरणा पुरस्कार २०१८ गेली ४० वर्षे भटके विमुक्तांच्या उत्थानासाठी निस्वार्थ पणाने काम करणारे या उपेक्षित व वंचित समाजाला प्रवाहात अाणनारे ॠषीतुल्य व्यक्तिमत्व केंद्रीय इदाते अायोग (२०१५-२०१८) चे मा.अध्यक्ष तथा देशपातळीवर विमुक्त घुमंतू जनजातीसाठी कार्य करणार्‍या विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद (अखिल भारतीय) या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्मवीर दादा इदाते यांना जाहीर करण्यात अाला अाहे.

हा सन्मान दादांचा व त्यांच्या कार्याचा तर अाहेच परंतू यानिमित्ताने या राज्यातील व देशातील समस्त विमुक्त घुमंतू (भटके) जनजातीचा सुध्दा सन्मान करण्यात अाला अाहे त्याबद्दल राज्य पत्रकार संघाचे मन:पूर्वक अाभार संघटनेच्या पदाधिकार्यांनी मानले आहे.

या पुरस्काराचे वितरण रविवार दि.१८ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी १०.३० वाजता सिद्धिविनायक लाॅन्स, संगमनेर,जि.अहमदनगर येथे अायोजित भव्य सोहळ्यात केले जाणार आहे. अाम्ही सर्व कार्यकर्ते अादरणीय कर्मवीर दादा इदाते यांचे मन:पूर्वक अभिनंदन करीत अाहोत अाणि राज्य पत्रकार संघाचे देखील अाभार व्यक्त करित अाहोत.
या सन्मान सोहळ्यासाठी भटके विमुक्त चळवळीत कार्य करणार्‍या सर्व कार्यकर्त्यानी, संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री.अनिल देविदास फड
कार्यवाह (विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद,महाराष्ट्र ) यांनी केले अाहे.

Leave a Reply