महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित महसुल राज्यमंत्री मा.ना. संजयभाऊ राठोड यांचे भव्य स्वागत

 

कारंजा (प्रतिनिधी) – शिवसेनेत एकनिष्ठ राहुन संपन्न झालेल्या विधान सभेच्या निवडणुकीत दारव्हा-दिग्रस विधानसभा मतदारसंघातुन 1,21,216 एवढे मताधिक्य घेऊन विदर्भात सर्वाधिक तर महाराष्ट्रात दुसर्या क्रमांकाचे मताधिक्य घेऊन 79865 मताच्या फरकाने विजयाची हॅट्रीक साधणारे महाराष्ट्रचे महसुल राज्यमंत्री मा.ना. संजयभाऊ राठोड यांचा रविवार दि. 7-12-2014 ला झालेल्या आगमनापित्यर्थ, कारंजा (लाड) येथील झाँसीराणी (बायपास) चौकात बंजारा समाज बांधवाकडून भव्य सत्कार करण्यात आले. सत्काराप्रसंगी शेकडोसमाज बांधवानी मिठाईचे वाटप करुन, फटाक्याच्या आतिषबाजीत व फुलांच्या वर्षावात हारार्पन करुन आपल्या लाडक्या नेत्यांचे भावपूर्ण स्वागत केले. मा. संजय भाऊचा आगमन सकाळी 10 वाजता होणार हे कळताच समाजबांधवानी झाँसी राणी चौकात गर्दी केली होती. आपल्या लाडक्या नेत्यांचे अभिनंदन करण्यासाठी पुष्पहार, पुष्पगुच्छ, भगवे शेले, शाल श्रीफळ तर कुणी मिठाई घेऊन हजर होते. भाऊ ठरलेल्या वेळेनुसार साडेतीन तास उशीरा आले पण गर्दी कमी होण्यापेक्षा त्यात वाढच झालेली होती. भाऊचे आगमन होताच कोण आलारे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, संजुभाऊ आगे बढो.. हम तुम्हारे साथ है, जय महाराष्ट्र जय भवानी-जय शिवाजी – जय सेवाला च्या जयघोषानी आकाश निनादुन गेले. जो तो हार घालून हस्तांदोलन करुन, हात उंचाऊन आपल्या नेत्याचे अभिनंदन करीत होते. उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी कारंजा, बंजारा तांडय़ाचे नायक भिकासींग राठोड, कारभारी रामचंद्र चव्हाण, प्राचार्य टि.व्ही. राठोड, शालीक राठोड (मंगरुळ) विलास राठोड, शामराव राठोड, मदत जाधव, शाम राठोड, आकाराम चव्हाण, प्रकाश राठोड, पि.डी. राठोड, प्रा. आर.डी. चव्हाण, विरेंद्र पवार, विष्णु आडे, डि.के. चव्हाण, के.डी. चव्हाण, डॉ. केशव पवार, आर.पी. राठोड, शेषराव चव्हाण, प्रकाश राठोड (गोरसेना), बलदेव चव्हाण, अरुण राठोड, रुपेश पवार, संतोष आडे, जितेंद्र पवार, रविंद्र चव्हाण, मनोज राठोड, सुरेश चव्हाण, अनिल जाधव, सुनिल जाधव, संतोष राठोड, प्रकाश चव्हाण, विजय राठोड, रामप्रसाद चव्हाण, तुकडय़ादास चव्हाण, उल्हास राठोड, दिलीप राठोड, संजय राठोड तथा असंख्य बंजारा बांधवानी स्वागत केले.

Leave a Reply