महानायक वसंत तु

अाैरंगाबाद – सुमारे ११
वर्षांहून अधिक काळ
महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद
भूषवणारा आणि राज्यात
हरितक्रांती घडवणारा
नेता दिवंगत वसंतराव नाईक
यांच्या जीवनचरित्रावर अाधारित ‘महानायक,
वसंत तू’ हा मराठी चित्रपट लवकरच पडद्यावर येत
अाहे. यात वसंतरावांची भूमिका साकारत अाहे
प्रसिद्ध अभिनेता व लेखक चिन्मय मांडलेकर.
‘नाईकांचे व्यक्तिमत्त्व साकारण्याची संधी मला
मिळाली हे माझे सौभाग्यच,’ अशी प्रतिक्रिया
त्याने ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली.
‘नाईकांचे व्यक्तिमत्त्व जाणून घेण्यासाठी मी
त्यांच्याविषयी भरपूर माहिती मिळवली, खूप
वाचनही केले. परंतु, कथानकच दर्जेदार असल्यामुळे
याची जास्त गरज वाटली नाही. दुष्काळाचा
निवाडा न झाल्यास स्वत: शनिवारवाड्यासमोर
फाशी घेईन, असे जाहीररीत्या सांगण्याची
हिंमत फक्त नाईक साहेबांतच होती. हे वाक्य
चित्रीकरणादरम्यान साकारताना अंगावर
शहारा येत होता’, असे चिन्मयने सांगितले.
दरम्यान, चित्रीकरण पूर्ण झाले असले तरी
निर्माता, दिग्दर्शकांनी अद्याप या
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर
केलेली नाही.
भूमिका साकारण्याचे अाव्हान
नीलेश जळमकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या
चित्रपटात वसंतराव नाईक यांच्या
जन्मापूर्वीच्या स्थितीपासून त्यांचे चार दशकांचे
राजकीय करिअर, मुख्यमंत्रिपदाचा काळ,
त्यांनी घेतलेले समाजहिताचे निर्णय, समाजाला
एकत्रित अाणण्यासाठी घेतलेले कष्ट आणि संघर्ष
चित्रपटात दाखवण्यात आला आहे.
‘राजकारण आणि समाजसेवेच्या क्षेत्रात असूनही
रुक्षपणाने जीवन न जगता आयुष्याला रसिकतेची
जोड देऊन ते जगले. त्यांची बोलण्याची लकब,
चालणे, वेशभूषा, केशभूषा आणि तोंडातील पाइप
या सर्व गोष्टी त्या काळच्या अन्य
पुढाऱ्यांपेक्षा वेगळ्याच होत्या. त्यामुळे एका
रसिक व्यक्तीचे आयुष्य साकारणे माझ्यासाठी
अत्यंत कठीण होते’, असे चिन्मय सांगतो.
सध्या मालिकेवरच फोकस
िचन्मय सध्या ‘तुका माझा सांगाती’ या
मालिकेत संत तुकारामांच्या भूमिकेत झळकत आहे.
तो एक चांगला लेखकही असून ‘दुनियादारी’ या
गाजलेल्या चित्रपटाचे संवादलेखन त्याने केले आहे.
सध्या मालिकेतच व्यग्र असून चित्रपटांची काही
योजना हाती घेतली नसल्याचे त्याने सांगितले.
पुसद, अकोल्यात चित्रीकरण
या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण हे वसंतराव नाईक
यांचे मूळ गाव पुसद, अकोला आणि मुंबईत करण्यात
आले आहे. त्या काळी विधान भवनातील माइक,
पंखे इत्यादी रचना वेगळी होती. त्यामुळे तशीच
स्थिती निर्माण करणे चित्रपटाच्या टीमसमोर
आव्हान होते, असे चिन्मय सांगतो.
बंजारा संस्कृती समजली
वसंतराव नाईक हे बंजारा समाजातील नेते. बंजारा
समाजाची संस्कृती ही खूपच भन्नाट आहे. सण,
लग्नसोहळा इत्यादी साजरा करण्याची त्यांची
परंपरा कोणालाही आकर्षित करते. या
चित्रपटाच्या माध्यमातून ही संस्कृती जाणून
घेण्याची संधी मला मिळाली, असे चिन्मयने
सांगितले.

सौजन्य :- गोर गजानन डी राठोड
सावरगांव बंगला ता.पुसद जि.यवतमाळ
9619401377

Leave a Reply