“मन” कुठले ही कार्य करण्यासाठी लागणारा म्हणजे “मन”

“मन”
समाजिक समस्या सोडविण्या साठी.द्वेष,ईर्षा,समाजद्रोह,स्वार्थी बुद्धि,, कोणाची ही  अवहेलना,मी मोठा की तू मोठा.आरोप  प्रत्यारोप हे सोडून एकमेकांचे मन प्रेमाने व् सद्विचाराने जिंकणे आवश्यक आहे मग निकराची लढाई आपोआप जिंकली जाते.
     सामाजिक चळवळ चालवताना आपल्या समाजासि,मनाशी ,धेयाशि एकनिस्ट असणे गरजेचे आहे जर मन समृद्ध विशाल नसेल तर पराभव मनात पहिल्यांदा होतो मग तो सामाजिक लढाई जिंकुच शकत
नाही कारण वास्तव हे आहे की जी माणसे मनाने  पराभूत  आहेत ती सामाजिक लढाई साठी  विचार ,विकासाचे मुददे प्रखरतेने  ,आत्मीयतेने मांडूच शकत नाही. त्या मुळे अपयशी ठरतात आणि चळवळी फसतात.
  म्हणून मन जिंकले तर जगातील कोणतीही नकारात्मक  शक्ति आडवु  शकत नाही व् धेय साध्य करता येते.
   जसे लोखंडा चे अस्तित्व कधीच नस्ट होत नाही फक्त स्वतः च गंजच नस्ट करु शकतो
  तसेच माणसालाही कोणी नष्ट करू शकत नाही पण त्याचाच मनाचा दृष्टीकोन त्याला नष्ट करू शकतो.
———सुखी चव्हाण,बदलापुर
          9930051865

~ गोर कैलास डी राठोड
बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल,
www.goarbanjara.com

image

Leave a Reply