मंदिराच्या जागेची आमदार यांचे स्विय सहाय्यक यांनी केली पाहणी

  • संत सेवालाल महाराज आणि आई जगदंबा माता” मंदिराच्या जागेची आमदार यांचे स्विय सहाय्यक यांनी केली पाहणी
संत सेवालाल महाराज आणि आई जगदंबा माता” मंदिराच्या पाहणी करतांना आमदार यांचे स्विय सहाय्यक प्रविणभाऊ हेंद्रे

बंजारा लाईव्ह, सतिष एस राठोड

कल्याण :- दि.४ सप्टेंबर रोजी मोहोने, आंबिवली (पूर्व) येथील बंजारा समाजाचे ‘आराध्य दैवत-संत सेवालाल महाराज आणि देवी-जगदंबा माता’ मंदिराच्या लहुजी नगर,येथील नियोजित जागेची कल्याण(प.) विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार-नरेंद्रजी पवारसाहेब यांच्या आदेशावरुन त्यांचे ‘स्विय सहाय्यक प्रविणभाऊ हेंद्रे’ यांनी पाहणी करुन मंदिर या जागेवर खूप वर्षापूर्वीचे असल्याचे त्यांचे निदर्शनास आले.

  • या पाहणी दौऱ्या दरम्यान त्यांनी मंदिराविषयी अधिक माहिती घेण्यासाठी “राष्ट्रीय बंजारा टायगर्स” चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन-अशोकभाऊ चव्हाण, संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच बंजारा समाजातील स्थानिक समाजबांधवांशी दिलखुलास चर्चा केली. या चर्चेदरम्यान अशोकभाऊ चव्हाण यांच्यासह सर्व बंजारा समाजबांधवांनी त्यांना संत सेवालाल महाराज आणि देवी-जगदंबा माता यांचे मंदिर लवकरात लवकर मा.कार्यसम्राट आमदार-नरेंद्रजी पवारसाहेब यांच्या आमदार निधीतून साकार व्हावे अशी ईच्छा व्यक्त केली. यावेळी मा.प्रविणभाऊ हेंद्रे यांनी समाजबांधवांना व राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या सर्व पदाधिकारी यांना सांगितले की, हे मंदिर मा.आमदार नरेंद्रजी पवारसाहेब यांच्या प्रयत्नाने आणि निधीतून लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल
  • यावेळी राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे मुंबई प्रदेश सचिव-सुरेश पवार,कल्याण तालुका सचिव-केवलसिंग तंवर,अटाळी-आंबिवली शहराध्यक्ष-गोकुळ राठोड,उपाध्यक्ष-गबरु राठोड,समाजसेवक-विठ्ठलभाऊ राठोड,यांच्यासह राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे पदाधिकारी उपस्थित होते.