भोकर येथे डॉ.नाईक दाम्पत्यांचा सत्कार

2015-06-03_165553
भोकर (प्रतिनिधी) – सामाजिक कार्यात नेहमी सहभागी होणारे डॉ.राम नाईक् आणि भोकर नगर परिषदेच्या न वनिर्वाचित आरोग्य व स्वच्छता सभापती सौ.डॉ.अनिता जाधव (नाईक) यांचा बंजारा समाजाच्यावतीने नुकताच सत्कार करण्यात आला. भोकर शहरातील विमल इंग्लिश स्कूलमध्ये पार पडलेल्या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.यु.एल.जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य रोहिदास जाधव, बी.डी.जाधव, मोतीराम राठोड यांची उपस्थिती होती. यावेळी सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे डॉ.राम नाईक आणि भोकर नगर परिषद निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल डॉ.अनिता नाईक या दोघांचा बंजारा समाजाच्यावतीने सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रल्हाद राठोड यांनी केले. तर आभार ईoशर जाधव यांनी मानले. या कार्यक्रमात सदाशिव आडे, राम चव्हाण, अशोक चव्हाण, लखन नाईक, विनोद चव्हाण यांच्यासह समाजाच्या इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply