भारतीय संविधान वाचन व जन जागृती अभियान” भाग क्र.1 – प्रा.दिनेश सेवा राठोड

*भाग १* *वाचा*????
*भारतीय संवीधान वाचन*
*व जनजागृती अभियान*
काही ठळक मुद्दे ****
भारतीय राज्यघटनेची
निर्मिती प्रक्रिया —–
विसाव्या शतकात अभ्यासपूर्ण राजकीय तात्त्विक मांडणी करणारा पाश्चात्त्य विचारवंत म्हणजे जॉन रॉल्स. या लेखात आपण जॉन रॉल्स या समकालीन विचारवंताने मांडलेल्या विचारांचा आढावा घेणार आहोत.
त्रिमंत्री योजनेतील तरतुदीनुसार ३८९ सभासदांची एक घटना समिती निर्माण झाली. या घटना समितीमध्ये पुढील तीन प्रकारचे प्रतिनिधी होते : ब्रिटिश प्रांताचे- २९२, मुख्य कमिशनरच्या प्रांताचे- ४३, संस्थानिकांचे- ९३.
जुल १९४६ मध्ये घटना समितीच्या सभासदांची निवडणूक झाली. २५ जुल १९४६ ला या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. एकूण जागा- २९६ इतक्या होत्या. त्यापकी काँग्रेस पक्षाला- २१२, मुस्लीम लीगला – ७३ आणि इतर पक्षांना ११ जागा मिळाल्या. संस्थानासाठी असलेल्या ९३ जागांसाठी निवडणुका झाल्या नाहीत. त्यांचे प्रतिनिधी नियुक्त झाले. मुस्लीम लीगने घटना समितीवर बहिष्कार टाकला. घटना समितीवर       पं. नेहरू, डॉ. राजेंदप्रसाद, वल्लभभाई पटेल, डॉ. राधाकृष्णन मौलाना आझाद, एम. गोपालस्वामी अय्यंगार, कृष्णस्वामी अय्यंगार, टी. टी. कृष्णम्माचारी, के. एम. मुन्शी, पंडित गोिवद वल्लभ पंत, जे. बी. कृपालानी, बी. जी. खेर, सी. राजगोपालचारी, बॅ. जयकर या व्यक्ती आल्या. घटना समितीत बहुसंख्य सदस्य हे काँग्रेस पक्षाचे होते. तरीही शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशनचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मुस्लीम लीगचे नेते महंमद सादुल्ला, िहदू महासभेचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी तसेच सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, बेगम रसूल, दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता आणि रेणूका रे या प्रथितयश महिला सभासदांचा घटना समितीत समावेश होता.
९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीचे पहिले अधिवेशन दिल्ली येथील संविधान सभागृहात (सध्याचा सेंट्रल हॉल) सुरू झाले. ते २३ डिसेंबर १९४६ पर्यंत चालले. पहिल्या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी पहिले दोन दिवस डॉ. सच्चिदानंद सिन्हा होते. ११ डिसेंबर १९४६ नंतर डॉ. राजेंद्रप्रसाद हे घटनासमितीचे अध्यक्ष झाले.
मसुदा समिती
२९ ऑगस्ट १९४७ साली घटनेची मसुदा समिती (Drafting Committee) निर्माण झाली. डॉ. बाबासाहेबााची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. या समितीवरच राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी टाकली होती. मसुदा समितीचे सदस्य म्हणून अलादी कृष्णस्वामी अय्यर, डॉ. कन्हैयालाल मुन्शी, गोपाळस्वामी अय्यंगर, मोहंमद सादुल्ला, टी. टी. कृष्णम्माचारी (डी.पी. खैतान यांच्या मृत्युनंतर नियुक्ती),  एन. माधव राऊ (बी. एल. मित्तर यांनी राजीनामा दिल्यानंतर नियुक्ती) यांनी काम केले. राज्यघटना निर्मिती करणे ही या समितीची महत्त्वाची जबाबदारी होती.
२१ फेब्रुवारी १९४८ साली मसुदा समितीने भारतीय राज्यघटनेचा अधिकृत मसुदा घटनासमितीला सुपूर्द केला. त्यानंतर घटना समितीत त्यावर सविस्तर चर्चा केली. मसुदा समितीने तयार केलेल्या मसुद्यांवर त्यानंतर एक अहवाल प्रसिद्ध केला. घटना मसुद्यावर ११४ दिवस विचारविनिमय केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या संमतीचा ठराव मांडला. तो ठराव मंजूर झाल्याचे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घोषित करण्यात आले. त्या दिवशी घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांची त्यावर स्वाक्षरी झाली. राज्यघटनेच्या अंतिम मसुद्याची एकूण तीन वाचने झाली.
* प्रथम वाचन
( ४ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर १९४८)
* दुसरे वाचन
(१५ ऑक्टोबर  ते १७ ऑक्टोबर १९४९)
* तिसरे वाचन
(१४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर १९४९)
भारतीय राज्यघटनेतील एकूण सदस्यांपकी त्या दिवशी उपस्थित असणाऱ्या २८४ सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि भारत हे राष्ट्र प्रजासत्ताक गणराज्य झाले. आजही २६ जानेवारी हा दिवस संपूर्ण देशभर भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

~ गोर कैलास डी राठोड
बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल,
www.goarbanjara.com

image

Leave a Reply