भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेच्या राष्ट्रीय व प्रादेशीक पदाधिकार्याची निवड

औरंगाबाद (प्रतिनिधी) – दि. 10 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे भारतीय बंजारा समाज कर्मचारीची राष्ट्रीय व राज्य कार्यकारणीची निवड करण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. ह्या बैठकीस संपुर्ण महाराष्ट्रातुन मोठय़ा संख्येने सर्व जिल्हा व तालुकाअध्यक्ष व कर्मचारी उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.दिगंबर राठोड (राष्ट्रीय अध्यक्ष), मा.प्रा.मोहन चव्हाण (राष्ट्रीय कार्याध्यक्ष), मा.गोविंद राठोड (प्रदेशाध्यक्ष), मा.सुभाष राठोड (प्रदेश महासचिव), मा.नवलभाऊ राठोड (प्रदेश कार्याध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली. ह्या गठीत कार्यकारणी नुसार प्रा.मोहन चव्हाण, नागपुर यांची (राष्ट्रीय अध्यक्ष), गोविंद राठोड, मुंबई (राष्ट्रीय कार्याध्यक्ष) व इंजि.राधेश्याम आडे, पनवेल. (राष्ट्रीय संघटन सचिव) अशी राष्ट्रीय कार्यकारणीची निवड करण्यात आली तर प्रदेश कार्यकारणीत इंजि अशोक राठोड, चंद्रपुर (प्रदेश अध्यक्ष), प्रा.टि.व्ही.राठोड वाशीम, (प्रदेश कार्याध्यक्ष), मा.अंबरसिंग बन्सी चव्हाण, मुंबई (प्रदेश महासचिव), मा.एन.डी.राठोड, लातुर (उपाध्यक्ष) प्रा.डॉ.सौ.भावना राठोड, मुंबई, (उपाध्यक्ष) असा प्रकार सर्वानुते भारतीय बंजारा कर्मचारी सेवा संस्थेची नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे.