भाजपाची विजय संकल्प बाईक रॅली उत्साहात संपन्न

■ रॅलीत राष्ट्रध्वज आणि देशभक्तीच्या घोषणेने नवचैतन्य

■ रॅलीत कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग

श्री. सतिष एस राठोड ✍

कल्याण :- भारतीय जनता पार्टी, कल्याण (प.) विधानसभा आयोजित भव्य विजय संकल्प बाईक रॅली उत्साहात संपन्न झाली. बाईक रॅली म्हणजे देशाच्या विकासासाठी एकाच घ्येयाने पक्षाचे कार्यकर्ते कसे संघटित व प्रेरित आहेत याचे एक उदाहरण असते. सकारात्मक विचाराधारणेतून ही बाईक रॅली पार पडली. संघटित वृत्तीने एकत्र येऊन काम करण्याची वृत्ती अशा क्षणांमुळे वाढण्यास मदत होते. मी पणा न ठेवता आज भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता एकत्र येऊन निव्वळ देशाच्या विकासासाठी कार्यरत आहे म्हणून देशहीतासाठी कार्य करण्याचे बळ व इच्छाशक्ती आम्हाला लाभते. ही बाईक रॅली केवळ पक्षाच्या जल्लोषासाठी किंवा विजय संकल्पासाठीच नाही तर पाकिस्तानवर कारवाई करून भारतीय वायू दलाने केलेल्या कामगिरीला सलाम करण्यासाठी आयोजित केली होती असे आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले.

मा. आमदार श्री. नरेंद्र पवार कार्यकर्त्यांसोबत रॅलीत सहभाग घेऊन आनंदोत्सव साजरा करतांना

ही बाईक रॅली दुर्गाडी किल्ला येथून सुरु होऊन गणेश टॉवर – एम.के. कॉलेज – वायले नगर– खडकपाडा सर्कल – साई चौक – संदीप हॉटेल – बिर्ला कॉलेज – प्रेम ऑटो – शहाड – वडवली – एनआरसी गेट मोहोने – गाळेगाव – बल्याणी – टिटवाळा श्री गणेश मंदिरमार्गे वाजपेयी चौक येथे समारोप झाला. आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली ही बाईक रॅली संपन्न झाली. संपूर्ण रॅलीमध्ये भारत माता की जय, जय हिंद, वंदे मातरम, जय जवान – जय किसान अशा घोषणांनी संपूर्ण कल्याण दणाणून गेले होते. नागरिकांनी जागोजागी रॅलीचे जल्लोषात स्वागत केले.

यावेळी भाजपा कल्याण शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, ठाणे – पालघर विभाग सरचिटणीस राजाभाऊ पातकर, मोहोने टिटवाळा मंडळ सरचिटणीस शक्तीवान भोईर, शहर सरचिटणीस अमित धाक्रस, कल्याण उपाध्यक्ष दिपेश ढोणे, रवि गायकर, दीपक भंडारी, स्वप्नील काठे, कल्पेश जोशी, प्रिया शर्मा, राजू राम, संदीप गायकवाड, अनंता पाटील, मनीषा केळकर, संतोष शिंगोळे, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply