भटक्या विमुक्तांना क्रिमिलेयर संज्ञेमधून वगळण्याबाबत महिन्याभरात कार्यवाही :- राजकुमार बडोले

भटक्या विमुक्तांना क्रिमिलेयर संज्ञेमधून वगळण्याबाबत महिन्याभरात कार्यवाही :- राजकुमार बडोले
आमदर हरिभाऊ राठोड यांच्या मागनीला यश 
कविराज चव्हाण /मुंबई
> राज्यातील भटक्या विमुक्तांना क्रिमिलेयर संज्ञेमधून वगळण्याबाबत महिनाभरात कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य हरिभाऊ राठोड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्री म्हणाले की, या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल शासनाला प्राप्त झाला आहे. त्यावर विधी व न्याय तसेच सामान्य प्रशासन विभागाचा अभिप्राय मागविण्यात आला आहे. ही सर्व प्रक्रिया महिनाभरात पूर्ण होऊन निर्णय घेण्यात येईल.
यावेळी झालेल्या चर्चेतील उपप्रश्नाला उत्तर देताना सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले की, या संदर्भात अधिवेशनानंतर पहिल्या आठवड्यात या समाजातील संघटना तसेच विधीमंडळ सदस्यांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

सौजन्य :- गोर गजानन डी राठोड
स्वंयसेवक
गो.ब.सं.स.भारत
9619401377