बी.डी.पवार लिखित विमुक्त या पुस्तकाचे प्रकाशन भारताचे माजी होम मिनिस्टर श्री सुशिलकुमार शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले

आज दिनांक १/९/२०१९ रोजी श्री बी.डी.पवार लिखित विमुक्त या पुस्तकाचे प्रकाशन नेहरू नगर सोलापूर येथै सकाळी ११ ३० वाजता महाराष्ट्र राज्य चे माजी मुख्य मंत्री आणि भारताचे माजी होम मिनिस्टर श्री सुशिलकुमार शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन श्री सुभाष चव्हाण यांनी केले होते या वेळी श्री लालसिंग राजपूत माजी उपमहापौर महानगरपालिका सोलापूर तथा जेष्ठ समाज सेवक आणि बंजारा समाजाचे श्री पी.पी.पवार आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार उपस्थित होते.
चालू वर्षी सुधा ६७ वे विमुक्त दिनाचे औचित्य साधून विमुक्त या पुस्तकाचा दुसऱ्या अंकाचे प्रकाशन करुन कै.चंद्राम चव्हाण गुरूजी याना समप्रित करण्यात आले आहे.

मुलाखत घेतली त्यावेळी शिंदे साहेबानी आरक्षण आणि विमुक्त या दोन्ही पुस्तके प्रकाशित करून लेखक बी डी पवार यांनी आजच्या तरुण पिढीला मोलाचे मार्गदर्शन केले आहे. या पुस्तकाच्या माद्यमातून विमुक्त म्हणजे काय?आणि या विमुक्त दिनाचे कोण शिल्पकार आहेत आणि वसंतराव नाईक, पद्मश्री रामसिंग भानावत चंद्राम चव्हाण गरूजी,मुडे गुरुजी यांनी कशा प्रकारे ५२ सेटलमेंट कँप मध्ये बंदिस्त लोकांना कसे बंदी मुक्त केले .याची सविस्तर माहिती दिलेली आहे. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी सोलापूर जिल्ह्यात प्रथमच येवून दिनांक ३१/८/१९५२ भारतात५२ सेटलमेंट क्यांप मधील बंदिस्त लोकांची मुक्तता करून त्याना विमुक्त घोषित केले. त्या दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी विमुक्त समाजात हा दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी ३१ ऑगस्ट हा दिवस विमुक्त दिवस साजरा करण्यात येतो

Tag : B D Pawar Written Book Vimukt And Aarkshan inogurant by Ex Home Minister Sri Sushil kumar Sinde at Solapur, Banjara Book, Gor Book

Leave a Reply