बंजारा सेनेच्या वतीने मा.नितीन गडकरी यांना निवेदन

नागपूर:- मा नितीन गडकरी केंद्रीय मंत्री (भारत सरकार ) यांची भेट घेण्यात आली. या भेटी दरम्यान
बंजारा समाजाला एस टी आरक्षण व ३००-५०० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या बंजारा तांड्यांना महसूल दर्जा व स्वतंत्र ग्रामपंचायत मिळावा. आणि या संघटनेच्या इतर काही मागण्या आहेत त्या संदर्भात चर्चा करण्यात आली.

गडकरी यांनी आश्वासन दिले की, तुमच्या मागण्या विषयी केंद्र सरकार व मुख्यमंत्र्यांशी बोलून त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो. या भेटी दरम्यान मा. चेतन चव्हाण महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अ भा बंजारा सेना ,मा सुरेश राठोड जिल्हाध्यक्ष नागपूर मा निरंजन जाधव सचिव नागपूर व इ. पदाधिकारी उपस्थित होते.