बंजारा समाज आकर्षित झाल्यास एखाद्या पक्षाला १२० च्या वर जागा मिळू शकतात,निलेश राठोड यांचे सर्वेक्षण

मुंबई (दि.२३ सप्टेंबर,२०१८)
“गोरबंजारा बहूल मतदारसंघ-महाराष्ट्र,भारत व विश्व दृष्टीक्षेपात”

प्रस्तावना:- जगभरात 65 पेक्षा अधिक देशांमध्ये वास्तव्याला असणारी गोरबंजारा ही जमात 63 विभिन्न नावाने ओळखली जाते,भारतातही ही जमात सर्व राज्यात कमीजास्त प्रमाणात असुन 44 वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते,त्यांची 15 कोटीच्या जवळपास लोकसंख्या आहे,देशाच्या स्वातंत्र्यासंग्रामात अनेक विरपुरूषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली,मात्र भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ह्या जमातीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले गेले,भाषावार प्रांतरचना करताना,सामाजिक आरक्षण देताना तसेच संविधानीक मानवाधिकारापासून ते वंचीत राहीले,एक जमात,एक भाषा,एक भूषा व एक संस्कृती असणारी ही जमात वेगवेगळ्या राज्यात विखुरली जाऊन वेगवेगळ्या नावाने विभीन्न प्रवर्गात टाकण्यात आली.
1960 मध्ये भाषावार प्रांतरचनेनुसार महाराष्ट्र निर्माण झाला मात्र इतर राज्यांत असलेल्या सांविधानिक सवलती महाराष्ट्रात दिल्या गेल्या नाहीत पर्यायाने 1 कोटीच्या आसपास लोकसंख्या व तुलनेत 10% असणार्या ह्या जमातीला इतर जातींसह 3% आरक्षण देऊन बोळवण केली गेली,आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार हरित क्रांतीचे प्रणेते मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी राजकारणापेक्षाही समाजकारणाला महत्व देत ह्या जमातीला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला, मात्र अजूनही भरीव कार्य करावयाचे बाकी आहे,राज्यात
दौरा केला,दरम्यान गोरबंजारा ही जमात विकासापासून कोसो दूर असून अजूनही विषण्ण अवस्थेत जगत आहे,कोणत्याही सोयी सुविधा त्यांना वेळेवर मिळत नाही,आणि त्यातही राज्यकर्त्यांनी बंजारा बहुल तांड्याना वेगवेगळ्या मतदारसंघात तोडून त्यांची एकजूट व वास्तव भंग करण्याचा घाट घातलाय,ही वस्तुस्थिती पाहिल्यावर राज्यातील सर्वच स्तरातील मान्यवर व तज्ञांसोबत त्याची चर्चा करून राज्यस्तरीय “गोरबंजारा कोअर कमिटी” स्थापन केली तसेच संबंधित खात्यांचे मा. मंत्री व मा.मुख्यमंत्री समवेत त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी बैठकी घेतल्या परंतु फारसा प्रतिसाद शासनाने न दिल्याने त्यांनी त्यांचे समाज संपर्क अधिकारी निलेश राठोड यांनी राज्यातील २८८ विधानसभा व ४८ लोकसभा मतदारसंघाचे सर्वेक्षण केले,१ लाखापेक्षा पेक्षा अधीक मतदारसंख्या असणारे ४ मतदार संघ,५०००० पेक्षा अधीक मतदारसंख्या असणारे ३३ मतदार संघ,२५००० पेक्षा अधीक मतदारसंख्या असणारे ७५ मतदार संघ,५००० पेक्षा अधीक मतदारसंख्या असणारे १०१ मतदार संघ तर राज्यातील दुसर्या क्रमावर असणार्या शिवसेना मतदार संघात जवळपास ६३ मतदार संघ आहेत,
ऊपद्रवमुल्यसिध्द करू शकणारे १५ मतदारसंघ आहेत
,बहूसंख्य मतदारसंख्या असणारे ३० मतदार संघ आहेत,निर्णायक मतदारसंख्या असणारे २१ मतदार संघ आहे,ह्या सर्वेक्षणासाठी निलेश राठोड यांनी ६ महिने कालावधीत मतदारसंघाचे सर्वेक्षण/निरीक्षण करून गोरबंजारा ह्या जमातीचा सर्वांगीण विकास कसा करता येईल? या दृष्टीने केलेला हा अल्पसा प्रयत्न…

सर्वेक्षणाची ठळक वैशिष्ट्ये/ऊद्दिष्ट्ये:
गोरबंजारा बहुल मतदारसंघाचे सर्वेक्षण (References taken from)

1)Linguistic Survey of India (1898-1928) : George A. Grierson

2)Casts in India

3)Census of India till 1952-2011

4)Census Data Maharashtra 2001-2011

5)Election commission of India

6)CEO,ECI Maharashtra

7)All Party Survey

8)All Casts,Tribes and Classes Survey (MS)

9)भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण-गणेश देवी-बलराम जाखड

10)महाराष्ट्रातील 288 विधानसभा व 48 लोकसभा मतदारसंघांचे वस्तूनिष्ठ सर्वेक्षण

11)महाराष्ट्र शेजारील कर्नाटक,आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यातील जिल्हा व मतदारसंघनिहाय
लोकसंख्येचे सर्वेक्षण.

12)भारतातील बंजारा बहूल व वास्तव्य असणार्या राज्यांचा प्रवर्ग,आरक्षण,राजकीय व सामाजिक
स्थितीचा आढावा

13)भारताबाहेरील जवळपास 63 देशांचा गोरबंजारा समान/सदृश जाती जमातींची स्थितीविषयक
अभ्यास.

14)तत्कालीन सर्व दैनिक,मासीक,पाक्षीक व तज्ज्ञांचे मत.

15)महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील निवडणूक व जिल्हा परिषद कार्यालयातील अभिलेख व संबंधित
अधिकारी यांच्यासोबत ,सर्व खासदार,सर्व आमदार,स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी,सामाजिक कार्यकर्ते,पक्ष कार्यकर्ते,विजयी व ऊपविजयी उमेदवारांसोबत चर्चा करून केलेले वस्तुनिष्ठ सर्वेक्षण.

16)महाराष्ट्रातील राजकीय,भौगोलिक,सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक व ऐतिहासिक माहिती.

17)महाराष्ट्राचे दहा वर्षातील वार्षिक अहवाल.

18)महाराष्ट्राच्या ग्रामविकास,महसूल,सामाजिक न्याय व शालेय शिक्षण विभागाने प्रकाशित केलेल्या
माहिती पुस्तिका.

19)भारतातील सर्व राज्यातील व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील तांड्याची संदर्भीत माहिती.

20)मतदारसंघ पुनर्रचना व विस्तार,नकाशासह समाविष्ट गावे.

21)महाराष्ट्रातील 15 लोकसभा व 100 विधानसभा मतदारसंघात प्रत्यक्ष भेटी देऊन,चर्चा व माहिती
संकलित करून केलेले निवडणूक सर्वेक्षण.

निलेश प्रभु राठोड

Nilesh Rathod
(मा.महसूल राज्यमंत्री यांचे विशेष कार्याधिकारी,मंत्रालय,मुंबई)
संपर्क:09892333233,[email protected]/[email protected]

Leave a Reply