बंजारा समाजाला सेवालाल महाराजांच्या विचाराची गरज -कांतीलाल नाईक

श्री. सतिष एस राठोड ✍

पारोळा– अखिल भारतीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल नाईक यांनी बंजारा समाजाला क्रांतिकारी संत सेवालाल महाराजांच्या विचाराची गरज असल्याचे प्रतिपादन २८० व्या जयंतीच्या निमित्ताने केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन व भोग लावण्यात आले. तसेच पुलगामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी मोरसिंग राठोड, प्रकाश जाधव, पोपट चव्हाण, लोटन जाधव,महारु राठोड, प्रा दिलीप राठोड श्रीकांत राठोड , नाना चव्हाण आदी मान्यवरांनी देखील समाज बांधवांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात बंजारा समाजातील प्रत्येक तांडयातील समाज बांधव व महिला भागिनी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्जुन राठोड, हिरा चव्हाण, प्रकाश पवार, डॉ.सोमनाथ पवार गोविंद पवार सुधाकर, चव्हाण दिलीप, चव्हाण मुरलीधर, पवार, सुनिता चव्हाण, विदया चव्हाण, सौ उन्नती राठोड, रोहिदास पवार, रविंद्र पवार, डॉ बाळू यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुभाष पवार यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.रविंद्र चव्हाण यांनी केले.

Leave a Reply