“बंजारा समाजात दांभिक पुरोगामी विचारधारेचा हस्तक्षेप”: समाजास ध्योक्याची घंटा”

jagrut-gor-banjara-goarbanjara.com

*जय सेवालाल* ????????

*बंजारा समाजात दांभिक पुरोगामी विचारधारेचा हस्तक्षेप — समाजास धोक्याची घंटा*

—————————————

*भाग-4*

अखिल विश्वातील गोर बंजारा समाज विश्वात सध्या ‘संक्रमणाचा काळ’

चालु आहे. राजकिय, सामाजिक व मुख्यतः वैचारिक दृष्टीने समाजातील एकंदरीत बुध्दी जीवी शिकलेली मंडळी व तरुण वर्गाचे एका क्रांतिकारी उत्थानाच्या दिशेने मोठया प्रमाणात मार्गाक्रमण होताना दिसुन येते आहे मात्र दांभिक पुरोगामीत्वाचा मुखवटा आज वेगवेगळ्या स्तरावर समाजात भ्रम तयार करीत आहे. एकीकडे प्रखर बुद्धीवाद..समाजवाद  आणि जाज्वल्य गोरधर्म.. या दोन्ही संकल्पनांचा गोंधळ सोडविण्याच्या दिशेने आपल्यातील आजच्या नव युवकांचा व समाजप्रेमी मंडळी चा कल मोठया प्रमाणात वाढतो आहे व समाजाच्या  भवितव्याच्या दृष्टीने हे मोठे आश्वासक चिन्ह आहे….त्यामुळे आजच्या आमच्या तरूणांनी खोट्या पुरोगामी लोकांच्या नांदी लागु नये. बुद्धीच्या विवेकावर आधारलेले व मनामध्ये उत्कट समाजप्रेमाने भारलेले रांगडे युवक ही प्रत्त्येक समाजाच्या  पुनरुत्थानाच्या प्रक्रियेमधली एक मोठी रोमांचकारी अवस्था असते. या अवस्थेच्या पुढची ‘निर्णायक’ अवस्था म्हणजे अस्सल निसर्गपुजक आपल्या  समाजाच्या  चरित्राच्या नवीन पानाची सुरुवात असते.हे लक्षात घ्यावे. आपल्या मुळ गोर चरित्रामध्ये इतिहासनिर्मितीची क्षमता आहे. त्यामुळे समाजातील  सध्याची सर्वांगीण परिस्थिती पाहता या बुद्धीनिष्ठ विचारप्रवाहामध्ये पुढच्या अनेक पिढ्यांना प्रस्फुरित करण्याचे ऐतिहासिक सामर्थ्य दडलेले आहे, असे म्हणता येऊ शकेल.हे काम आमचा युवकच अंगीकारु शकतो.या वैचारिक गोरधरम उत्क्रांतीमागे असणाऱ्या प्रेरणांना आपली narrow domestic walls व राजकीय अस्मिता व स्वार्थी विचार  बाजुला ठेवून अगदी तटस्थपणे पाहणे,व समाजहितास अग्रभागी ठेवावे लागेल.

‘अन्य दुसऱ्याची खोटी चळवळ’ आणि ‘खोटे क्रांतीकारी बदल’ यांसारखे शब्द जेंव्हा सामाजामध्ये मोठया प्रमाणात चर्चिले जात असतात, त्यावेळी या दोन्ही शब्दांच्या कार्यकारणभावाकडे व गर्भितार्थाकडे पाहण्याचे एकाहून अधिक मतप्रवाह विचारप्रवाह तथा धर्मप्रवाह ही त्यांच्यासमवेत निर्माण झालेले असतात. हे मतप्रवाहच पुढे वादांमध्ये व त्याहीपुढे वादविवादांमध्ये परावर्तित होतात.समाजाच्या दुफळी निर्माण करतात, आज असेच चित्र प्रकर्षाने दिसत आहे.हे समाजाच्या  सामाजिक  अंगाच्या दृष्टीने हा एकप्रकारचा आणीबाणीचा काळ म्हणावे लागेल, ती एका सामाजिक वादळाची आरंभीची अवस्था आहे…

त्यामुळे निर्णायक समाजभावानांचा विचार करून आजच्या नव तरूणांनी व बुद्धीजीवी गोर विचारवंतानी नी खोट्या पुरोगामी विचार करणाऱ्या मंडळीच्या संपर्कात   येऊन खोटी पुरोगामित्वाची झुल घालु नये ..सावधतेने एकत्र येवू या व केवळ गोर विचाराने व निसर्गनियमन करून समाजास ऊत्कर्षाच्या दिशेने वाटचाल करू या…

✍ *वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ महाराष्ट्र*

*क्रमशः …* पुढील भागात
“सौजन्य”

गोर कैलास डी राठोड

2 Comments
  1. Avatar
  2. Avatar

Leave a Reply