बंजारा समाजाच्या रॅलीने वेधले कळवावासियांचे लक्ष

Banjara woman
बंजारा समाजास सभागृह न मिळाल्यास आंदोलन ठाणे-कळवा परिसरात सुमारे दीड लाखाच्या आसपास बंजारा समाज वास्तव्यास आहे. मात्र तरीही या समाजाकडे सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याची खंत यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केली. बंजारा समाजाला एक हक्काचे सभागृह मिळावे आणि समाजाच्या अडी अडचणीकडे शासनाने लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन छेडू असा ठराव मांडण्यात आला.

ठाणे (प्रतिनिधी) : अगर तू है लक्खी बंजारा और शेप भी तेरी भारी है ! ऐ गाफिल तुझसे भी चढता इक और बडा ब्यापारी है ! क्या शक्कर मिसरी कंद गरी, क्या सांभर मीठा-खारी है ! क्या दाख मुनक्या सोंठ मिरच क्या केसर लौंग सुपारी है ! सब ठाठ पडा रह जावेगा जब लाद चलेगा बंजारा ! असे गीत म्हणत… अतिशय सुक्ष्म नक्षीकाम केलेली घागरा चोली, हातात पूर्ण हातभार कंगणाच्या बांगडय़ा, पायात पैंजण, डोक्यावर चांदीचे झुमके अशा आकर्षक पारंपरिक वेषातल्या बंजारा समाजाच्या महिलांनी सोमवारी सार्या कळवावासियांचे लक्ष वेधून घेतले. निमित्त होते संत सेवालाल महाराज जयंतीचे. ठाणे-कळवा परिसरातील जय सेवालाल सामाजिक संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या समाजाचे महान संत सेवालाल महाराजांची जयंती रविवारी पार पडली. यावेळी बंजारा वेशभूषेतील महिला आणि पुरुषांनी पारंपारिक नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. भव्य रॅलीला कळवा स्थानकापासून सुरुवात करण्यात आली. शिवाजी हॉस्पिटल मार्गे कळवा नाका येथे आलेल्या या रॅलीतील आकर्षक पारंपरिक वेशभूषेतल्या बंजारा महिला आणि पुरुषांनी सार्या कळवावासियांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमास शंकर पवार, सिताराम चव्हाण, विलास राठोड, मिथून चव्हाण आदी उपस्थित होते.

Leave a Reply