“बंजारा समाजाचे विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात होत आहेत अव्वल”

मित्र हो जय सेवालाल👏
एकेकाळी बंजारा तांड्यातील विद्यार्थी 10 वी किंवा 12 वीला फक्त पास झाले तरी खुप खुश असायचे.पण आजकाल अस झाले कि मुलांना खरोखर शिक्षण मिळायला सुरुवात झाली आहे.भलेही शिक्षणाला खुप खर्च वाढलये गरीब विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेत प्रवेशासाठी झगडावे लागते पण तो विद्यार्थी त्या चांगल्या शाळेत प्रवेश घेउन चांगल्या प्रकारे मार्क मिळऊन पास होतोय हि चांगली गोष्ट आहे.मित्र हो आपल्याला माहित आहे कि सरकारी नौकरी मिळत नाही तर समोरच भवीष्य काय असायला पाहिजे आणि कशा प्रकारे व कोनते शिक्षण शिकायला पाहिजे.ते आपण चांगल्या मार्गदर्शन करनाऱ्या बाधवांशी सल्ला घेऊन समोरील वाटचालीला सुरवात करावी.पालकांना कळकळची विनंती आहे आपण आपल्या मुलानां चांगल्या प्रकारे मार्गदर्श करावे व त्यांना आय टी क्षेत्रात प्रवेश करावे आणि आपल्याला भविष्यात कुठेही नौकरी मिळेल,Polytechnic,ITI,mechanical eng.civil eng.automobile  eng.chemical engineering,computer engineering,अस्या प्रकारचे क्षेत्र निवडावेत व आपल्या पुढिल भविष्यात गरजु विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.कारण मार्गदर्शक विना भविष्य नाही.आपल्या तांड्यातील सर्व पालक व विद्यार्थ्यांचा मनोबल वाढेल ते क्षेत्र निवडुन शिक्षण घ्यावे.बंजारा समाजाच्या तांड्या मध्ये सर्वात हुशार मुले आहेत पण त्यांना चांगले मार्गदर्शक मिळाले नाही म्हणुन ते आज बेकारीचे दिवस काढत आहे .मित्र हो चांगल्या गोष्टी आपल्याला माहित असेलतर बिंधास्त पणे समोरून जाऊन त्या गरीब विद्यार्थ्यांना सांगावे व त्याना सरळ रस्ता कुठला व अवघड रस्ता कुठला आहे ते सांगावे..कारण 10वी पास होणारा मुलगा खुपच समजदार असेल तस नाही ते पास होण्याच्या धुंदीत स्वताच्या भविष्याची हडबडुन जाऊन क्षेत्र निवडतात.व समोरील भविष्य त्यांचा समोर न जाता कुठेतरी अडकळतो तस न होता.त्यांना न हडबडता क्षेत्र निवडायला सांगावे..तरच आपल्या समाजाची प्रगची तयारी होईल व समाज खरोखर प्रगती पथावर जाईल.
10 वी 12 वी च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना माझ्या कडुन खुप खुप शुभेच्छा..तुमत भविष्य चांगल्या प्रकारे घडो असी ईश्वर चरणी प्रार्थना.
सौजन्य:- गोर कैलास डी.राठोड
स्वयसेवक गोर बंजारा संघर्ष समिती भारत,व
संस्थापक/ अध्यक्ष.
जय सेवालाल बंजारा सेवा संस्था ठाणे,रजि./ सेवादास वाचनालय सावरगांव बंगला ता.पुसद जि.यवतमाळ 445209
मो.9819973477