बंजारा समाजाचे महानायक,हरितक्रांतीचे जनक,माजी मुख्यमंत्री-स्व.वसंतरावजी नाईक” याच्याबद्दल आक्षेपार्ह(अश्लिल) विधान

🙏जय सेवालाल.🙏
दि.२८’डिसेंबर-२०१५.रोजी “पांढरकवडा,जि.यवतमाळ” येथील ‘शार्दुल चहाल’ या व्यक्तीने “बंजारा समाजाचे महानायक,हरितक्रांतीचे जनक,माजी मुख्यमंत्री-स्व.वसंतरावजी नाईक” याच्याबद्दल आक्षेपार्ह(अश्लिल) विधान करुन ‘बंजारा समाजाच्या भावना दुखवून दोन समाजामधे तेढ निर्माण केल्याबद्दल “राष्ट्रीय बंजारा टायगर्स-महाराष्ट्र प्रदेश” तर्फे ‘जळगांव येथील अप्पर जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी-श्री.राहुल मुंडके’ यांना ‘जाहीर निषेध’ आणि आरोपीवर “कडक कारवाई करुन ‘बंजारा समाजाला न्याय मिळावा’ या आशयाचे  निवेदन देण्यात आले.

        यावेळी “प्रदेशाध्यक्ष-श्री.अशोकभाऊ चव्हाण,राष्ट्रीय सरचिटणीस-श्री.वाल्मिकभाऊ पवार,राष्ट्रीय संघटक-श्री.मुरलिभाऊ चव्हाण,उत्तर महाराष्ट्र संघटक-श्री.पदमसिंग पवार,जळगांव जिल्हाध्यक्ष-श्री.रतिलाल चव्हाण,जिल्हा सचिव-श्री.अजय नाईक,भुसावळ तालुका सचिव-चि.भरत पवार व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.