“बंजारा समाजाचे प्रेरणास्थान” ना.वसंतराव नाईक,

*”बंजारा समाजाचे प्रेरणास्थान”*: हरित क्रांतीचे जनक ना.वसंतरावजी नाईक,

बघता बघता 37 वर्ष निघून गेली.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर सव्वाअकरा वर्ष राहिलेल्या महानायक,वर्षोन वर्ष बंजारा हृदयावर राज करणारे हरित क्रांतीते प्रणेते,ना.वसंतरावजी फुलसींग नाईक साहेब,यांची 103 वी जयंती.
महाराष्ट्राची जडणघडण करण्यात वसंतरावजी नाईक साहेब,यांचा फार मोठा सोनेरी वाटा आहे.
महाराष्ट्राला शेतीच्या आघाडीवर समृद्ध करण्यातही नाईक साहेबांचे नाव हिरव्या पानांवर लिहले जाईल.
शेती आणि शेतकऱ्याला प्रतिष्ठा देताना स्वावलंबनाचा महामंत्र मा.वसंतरावजी नाईक साहेब यांनीच दिला आणि म्हणून महाराष्ट्र ‘मिलो-मुक्त झाला!
केवढी हि दूरदृष्टी आणि केवढा निश्चयी स्वभाव!
खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या सकारात्मक बांधणीत नाईक साहेबांचा फार मोठा वाटा आहे.
या महान व्याक्तीमहत्वाला त्यांच्या 103 व्या जन्मोत्सव या दिनी विनम्र अभिवादन.
*”जय सेवालाल..जय वसंत”*

*-:सौजन्य:-*
✍ *~ गोर कैलास डी राठोड*
*सामाजिक कार्यकर्ता ठाणे मुंबई*

image

Tag: Ex CM Vasantrao Naik

Leave a Reply