बंजारा समाजाचे धर्म परिवर्तन करणाऱ्या ख्रिचन मिशनरीवर बंदी घाला पत्रकार कविराज चव्हाण यांची मागणी

मुंबई/प्रतिनिधी हिंदू आणि मुस्लिम या बहुसंख्याक समाजाकडून आगामी काळात आपल्यावर ख्रिचनावर अन्याय होऊ नये यासाठी ख्रिचन समाजाची संख्या वाढविण्यासाठी बंजारा, आदिवाशी आणि इतर मागासवर्गीय समाजाचा मिशनरीकडून धर्मांतर करण्यात येत आहे. धर्मांतर करने हे गुन्हा असले तरी मिशनरिकडून हे प्रकार जोरदार करण्यात येत आहे. बंजारा धर्म टिकविन्यासाठी ख्रिचन मिशनरीवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी पत्रकार कविराज चव्हाण यांनी सोमवारी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात केली.
बंजारा,आदिवासी आणि इतर मागासवर्गीय समाजमध्ये दमदार नेते नसल्यामुळे हा समाज सॉफ्ट आहे परिणामी या समाजाला ख्रिचन करण्यामध्ये अडचणी येत नाही.
कविराज चव्हाण
पत्रकार