बंजारा समाजाचा खरा आदर्श संत सेवालाल

मिञ हो जय सेवालाल..!!

आज काल बंजारा समाज म्हणजे बोहल्यावर चडलेला समाज आहे अस वाटतं त्याच कारण पण तसच आहे.ज्या समाजा मध्ये सर्वात पविञ शब्द देनारे संत सेवालाल महाराज यांच्या रूपाने खरा आदर्श जन्म घेउन सर्व बांधवाना व सहकार्यांना चांगले उपद्देश देउन गेले.तर त्या समाजाचे असे हाल होता कामा नये.पण ह्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे,ते म्हणजे तांड्यातुन शहरात स्थलांतर होऊन समाजाची व सेवालाल महाराजाची आठवन न करता स्वार्थी पणाने स्व:तच्या बँका व खिसे भरण्या पलीकडे आम्हा सवडच नाही.जर आम्ही असच स्वार्थाने जीवन जगत राहिलो तर आपल्या समाजाच्या संस्कृतीची विसर पडणार हे नक्कीच.

संत सेवालाल महाराजानी जे शब्दावली आपल्याला दिली ती अभीश्राप बनेल व काही वर्षातच बंजारा समाज नष्ट होईल.मिञ हो बंजारा समाज म्हणजे खुप मोठा व्यापारी गण मानला जात होता,आम्हाला त्याच भानही राहील नाही.आम्ही फक्त नौकरी/ कामगार या गोष्टीला जास्त म्हत्व देत आहोत.व त्याच कारणी भुत पण आपणच आहोत,कारण समाजाच्या बाधंवाना किंवा स्वताच्या भावांना सहकार्य न करता आम्ही स्वतसाठीच जगायच ठरवलेल आहे.मिञ हो बंजारा समाजात पहिल्या सारखी बांधिलकी राहिली नाही.म्हणुन आपल्या समाजाच खर रूप दिसत नाही,पूर्वी आपले आई वडील,काका,मामा,व सारे नातेवाईक मंडळी एकमेकांना कुठल्याही अडी अडचनी मध्ये मदतनीस म्हणुन धाव करीत असे.पण आताचे स्वार्थी बांधव ह्या गोष्टी सर्व विसरून गेलेत.जर बंजारा समाजाच खर रूप तुम्हाला अखेर पर्यंत ठिकवायच असेल तर आम्हा सर्व बांधलाना एकञ येऊन तांड्या कडे लक्ष केंद्रीत करावे लागेल.व तांड्यातील गोर गरीब बांधवाना विश्वासात घेऊन त्याच्या मुला मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे लागेल,त्याना वाचनाची गोडी तयार व्हॉवी म्हणुन त्यांना वाचनालयासाठी तुम्हाला झटावे लागेल,व शिक्षण कसे व शिक्षणाचे म्हत्व त्यांना पटवुन द्यावे लागेल तरच बंजारा समाजाचे उदयास येणारे आधिकारी वर्ग सापडेल व तेच अधिकारी वर्ग येणाऱ्या विद्यार्थ्याना मदत करतील, त्या वेळेस बंजारा समाजाची वाटचाल सोईस्कर होईल व समाजामध्ये एकोपा निर्माण होईल,जो पर्यंत आपन स्वता होऊन काही करूशकत नाही तो पर्यंत आपण कुठल्यातरी नेत्याच्या शब्दाचे बळी पडलेलो असेल.व तो आपनास फक्त शब्द देत राहील अन् स्वार्थी नेता स्वताच दुकान आपल्या भरोस्यावर चालवत राहील.आपण फक्त आपले हाल आपेष्टेने दिवस काडत राहु.म्हणुन हा लेख लिहन भागपडल.हे वाचुन तरी आपल्या सर्वाचे डोळे उघडेल अस मला वाटते.विचार करूया अन् बंजारा समाजाच रक्षण करूया नाहीतर समाजाच अस्तीत्व संपेल.आपले श्रद्धास्थान संत सेवालाल महाराज ह्यानी जे शब्द सांगितलेल आहे ते सर्व खरे होत आहे. *बार कोसेपर दिवो बळिय* .हे आपल्या संताने २७६ वर्षपूर्वी सांगितलेल शब्द आहे.त्यांना माहित होत समोर काय होनार.त्यांना विसरून आपल्याला कस चालनार.वाचवा समाजाला व शिकवा गोर गरीब मुलांना. *दुसेपर भरोसो मत करजो..पण दुसरेर भरोसेर बणजो…!!* हे वाक्य पण खुप विचार करण्या सारख आहे.संस्कृती टिकविली पाहिजे हे आपल्या हाती आहे आपण जर एकतेने राहिलो तर समाज खरोखर भर उन्हाळ्यामध्ये बिना पाण्याच पळसाच्या फुला सारख फुले तेव्हा * गोर केशुला नई मोरीय हे शब्द सेवालाल महाराज यांचे खरे होतील.अस माझ मत आहे…!! बंजारा समाजाचा खरा आदर्श फक्त अन् फक्त संत सेवालाल महाराज हेच आहे व त्याच्या प्रत्येक शब्दाला चांगस रूप देउन जर प्रत्येकाला म्हत्व सांगीतल तर आपल व समाजाच्या प्रत्येक बांधवाला प्रेमाच खर अर्थ समजेल. आणि आपल सर्वाचं जीवन धन्य होईल.”शिकच शिकावच शिकेराज घडावच”..!!

शिकेजेरी साजपोळी..!!

विचार करा व निस्वार्थपणे समाजा बद्दल निष्टा ठेवा..!!

जय सेवालाल..!! जय गोर..!!

प्रमुख प्रतिनीधी.

रविराज एस. पवार

Leave a Reply