बंजारा (विमुक्त-भटक्या जमातीचा नंगारा मोर्चा) काही समज – गैरसमज  कृपया वेळ काढून वाचा…. – प्रा. दिनेश राठोड

*जय सेवाल जय वसंत*

????????????????????????????????????????????????????????

*बंजारा (विमुक्त-भटक्या* *(जमातीचा नंगारा मोर्चा)*

????????????????????????????

*काही समज – गैरसमज*

*(पोस्ट विस्तृत आहे.)   कृपया,आपला बहुमोल वेळ काढून जरुर वाचा.*)

????????????????????????????

*(आपल्या समाजाच्या सर्व*  *संघटनांचे पदाधिकारी,*  *कार्यकर्त्यांना व समस्त*

*बंजारा समाज मनातील*

*अंत:करणातील  हाक ..)*

*बांधवांनो,आपण समाजासाठी सर्वांनी स्वयंप्रेररेणे, स्वखर्चाने व एकजूटीने ७ डिसेंबर ला नागपूर येथील नंगारा मोर्चात सहभागी होवू या*.

महाराष्ट्रातील शोषित,पिडित, दुर्लक्षित व संविधानिक हक्कापासून दुरावलेल्या बंजारा समाज आपल्या न्यायहक्कापासून पुरोगामी समजत असलेल्या  राज्यात आजही आपण न्याय विकासापासुन कोसो दुरच असल्याचे चित्र पाहवयास मिळते.  आज आपल्या न्याय मागण्याच्या पाठपुरव्यासाठी व निश्चित  हक्कासाठी व लोकशाहीच्या उदात्त, प्रांजळ व पविञ भुमिकेतून बंजारा समाज संत सेवालाल महाराजाच्या पांढऱ्या  झेडयांला प्रतिक मानून, त्याच्या नेतृत्वाखाली  व वसंतरावजी नाईक साहेबांच्या प्रेरक विचाराने समाजातील सर्व संघटनांच्या समर्थनासह सदर नंगारा मोर्चाचे आयोजन 7 डिसेबंर 2016 ला नागपूर अधिवशनावर होत आहे.मोर्चा यशस्वी  करण्यासाठी आमच्या  समाजातील काही संघटना तळमळीने राञदिवस तांडा, तालुका जिल्हास्तरापर्यंत जावून गाड झोपेत असलेल्या समाजाला आपल्या न्याय  हक्काप्रती लोकशाही मार्गाने जागृत करण्याचे काम तळमळीने केले आहे.व आजही करीत आहे. त्यायोगे आपल्या न्यायमागण्याप्रती तांडयातील समाज ताकतीने जागृत होतांना दिसतोय. तसेच भटक्या विमूक्त्यांच्या इतर सघंटना आमच्या बांधवापर्यंत कितपत पोहचल्या असा गैरसमज आमच्या मनात निर्माण होणे वावगे ठरु नये, मोर्चातील खालील बाबींना महत्व देवूनच मोर्चाचे नियोजित आहे.

*1.* आपले गोर धर्माचे संस्कृतिक प्रतिक असलेल्या नंगाराच्या दणदणीत स्वरूपाच्या लहरी ( *नंगारा घोरावा*) प्रत्येकापर्यंत पोहचाव्या म्हणून ते मोर्चाचे प्रतिक नंगारा मानल्या गेलेले आहेत. तसेच आमच्या गोरधर्माचे पांढऱ्या त्या  झेडयांला प्रतिक मानून, त्याखाली आम्ही समाजबांनव मोर्चा साठी एकञीत येत आहोत.

*2.* हा मोर्चा बंजारा समाजाच्या कुणी एका संघटनेच्या  नेतृत्वात  नसून समस्त बंजारा बांधवांचा आहे.  मोर्चाला कुणाचा राजकीय हस्तक्षेप किंवा स्वार्थ सुद्धा  नाही.

*3*. आपल्या न्याय मागण्या व घटनात्मक हक्कासाठी हा बंजारा  समाजबांधवांसह समस्त विमुक्त- भटक्यांचा मोर्चा म्हणून संबोधल्या जात आहे.

अशा महत्वपूर्ण बाबीला प्रमाण माणून मोर्चाचे आयोजन होत असले तरी आजही आमच्या मनात अनेक समज /गैरसमज तयार होतांना दिसत असले तरी आमच्या समाजातील अनेक संघटनाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या मोर्चा संबंधातील आपला मतभेद दुर करून सर्वांनी संघटीत ताकदीच्या जोरावरच आपल्या न्याय हक्कासाठी शासनावर दबाव आणता येईल एवढे खरे, तरी आमच्या संघटनेच्या पदाधिकार्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आहवान करणे अगत्याचे आहे परंतू तसे काही कडून  दिसून येत नाही. का नाही ? हा मोठा प्रश्न आहे.निष्पाप असलेल्या  बंजारा समाजाच्या तांडयावरील अनेक महत्त्वाचे व जिव्हाळ्याचे त्यांचे अनेक प्रलंबीत प्रश्नाला वाचा फोडूनच सर्वांच्या ताकतीने न्याय पदरात पाडावा लागेल.  आमचेवरील गुन्हेगारी जमातीचा कलंक अजूनपर्यंत मिटलेला नाही.  असेच होत राहीले तर तांडा पर्यंत विकासाची पाहाट  कधिच उगविल्या जाणार नाही.  आज तांडयातला आमचा बंजारा बांधव त्याच मरण यातना भोगत आहे.  उदरनिर्वाहासाठी उस तोडल्याशिवाय पर्याय नाही. सुशिक्षितामध्ये बेरोजगारी आहे. आज अनेक तांडयात स्वतंञ ग्रामपंचायत नसल्याने मुलभूत सुविधापासून समाज वंचित आहे. लोकसंख्येच्या आधारावर जनगणना होत नसल्याने विशिष्ट आर्थिक बजेट वाटयाला येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण नसल्याने आम्ही विकासापासून कोसो दुर आहोत.  क्रिमेलीयरची अट ही जाचक स्वरूपाची असून आमच्या शैक्षणिक नुकसानीस कारणीभूत आहे.  आमच्या  समाजाला मुळातच आदिवासी असल्याचा ऐतिहासीक वारसा आहे.  तसे निकषही पूर्ण करीत असूनही आज आम्हाला विविध राज्यात वेगवगळया संवर्गाचे आरक्षण मिळते.  ही बाब प्रामुख्याने लक्षात घेवून एस.टी. चे आरक्षणास आम्ही पाञ आहोत. यासाठी सर्वव्यापी लढा उभारण्याची काळाची गरज आहे. व ते संविधानिक मार्गाने आम्हास मिळाल्याच पाहिजे.

आमचे सर्वांचे आदर्श, आशा स्थान व उर्जा-स्ञोत मा.वसंतरावजी नाईक साहेब यांचे अंतरराष्ट्रीय दर्जाचे सभागृह बंजारा कर्मचारी सेवा संस्था या आमच्या कर्मचारी संघटनेच्या कठोर प्रयत्नाने (राजभवन)नागपूर परिसरात  बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात असतांनाही त्याला अन्य ठिकाणी हलवण्यास व बांधण्यास कट कारस्थान रचल्या जात आहे.

आमच्यातल्या संवेदना लोप पावताना दिसतात. वसंतरावजी नाईक साहेबंच्या कृपेने आज आम्ही नौकरीत आहोत.परंतू आमच्यातील नौकरवर्ग मात्र उपयुक्त सामाजीक हितावह  बांधीलकीपासून जास्त प्रमाणात  दुर असल्याचे चिञ सध्यातरी पाहवयास मिळते. हे समाजाच्या भविष्यासाठी घातक ठरनार आहे. आम्ही नौकरवर्ग अन्य तुलनेत आर्थिक सक्षम आहोत.

आमच्या हक्काच्या सुटयामधून एक सुटी समाजासाठी देऊन , ग्रामीण व शहरी भागातील नोकरी करणारा बंजारा बांधव जरी मोर्चात सहभागी झाला तर मोर्चा नक्कीच यशस्वी होईल.

आज समाजावर अनेक स्वरूपाचे अत्याचार, जुलूम व अन्यायाच्या घटना घडतांना दिसून येतात.  माञ अशा वेळीसुद्धा आम्ही सर्व सघंटनामिळून सांघिक प्रतिकार करतांना दिसत नाही.

उदा.नाशिक येथील घटना.हे चित्र  प्रथमदर्षी अनुभवास आलेली आहे.आमच्यात एकात्म ताकदीचा प्रकर्षाने आसलेल्या अभावामुळे   मिडिया सुध्दा आमच्या अन्यायाला वाचा फोडत नाही. आमच्या काही संघटनांनी आमच्या न्याय मागण्या संदर्भात अनेक आंदोलने केलेली असतांनाही आमचे एकीचे बळ अपूरे पडते. त्यामूळे आम्ही आमच्या मुलभूत न्याय हक्कापासून आजूनही वंचित आहोत.आज अन्य समाज त्यांच्या न्याय हिताच्या प्रश्नासाठी सर्व राजकीय नेते व बांधवासह एकञ येतात,लढा,आंदोलन उभारतात.. आम्ही का एकञ येवू नये हा यक्ष प्रश्न आहे.? आमच्या समाजातील  सर्वच संघटनाचा मुळ हेतू समाजाचे कल्याण, गोरधर्म व समाजाचा निश्चत विकास व्हावे  हाच गाभा आहे. याच मुददयाला प्रमाण माणल्यामुळे नागपूर येथील नंगारा मोर्चा संदर्भात कुठलाही गैरसमज समाजबांधवांनी तयार करू नये याची दक्षतही सर्वात प्रथम घेण्याची गरज आहे.म्हणून खालील बाबीला अनुलक्षून समाजातील सर्व संघटनांनी मोर्चात सक्रिय भाग घ्यायलाच हवे कारण —

*1.* जर मोर्चा सेवालाल महाराजाच्या पांढऱ्या झेंडयाच्या निरपेक्ष नेतृत्वात होत असल्याने त्याला विरोध करण्याचे किंवा मोर्चात सहभागी न होण्याचे धाडस आमच्यात निर्माण होता कामा नये.

*2.* समाजाचे भले व्हावे असे आपण प्रत्येकाला व संघटनेला वाटते म्हणून समाजाच्या न्याय, हक्क व भल्यासाठीचे काम सर्व संघटनेचे ताकतीवर ते मिळविता येईल.जिंकता येईल

*3.* विशेष म्हणजे आजपर्यंत समाजाच्या हितासाठी जेवढी आंदोलने झाली त्यासाठी समाजाकडून रोख व निधी स्वरूपात मदत देण्यात आलेली होती, परंतू या नंगारा मोर्चासाठी कुठल्याही स्वरूपाचा निधी गोळा केलेला  नाही.आमच्या सक्षम नेतृत्व उभारण्यासाठी तळमळीने

विविध संघटनेच्या संघटकासह व समाज

सेवकाच्या हेरेरीने व निष्ठेने  मा.प्रा.पि.टी.चव्हाण सर, मा.प्रा.मोहण चव्हाण सर, मा.बळीभाऊ राठोड साहेब मा.प्रा.कृष्णा राठोड, मा.प्रा.दिनेश राठोड,प्रा.विलास राठोड , मा.प्रा.मोतीराज राठोड, मा.प्रा.संतोष राठोड व बहुसंख्य  इत्यादी यांनी स्वखर्चाने तांडा.तालुका व जिल्ह्यात  मोर्चा जागृतीसाठी महाराष्ट्रभर जागृतीचे कार्य केले आहे. व ते समाजाच्या प्रशंसेस पात्र आहेत.परिणामी तांड्यातील समाज स्वत:च्या खिशातून स्वयप्रेरणेने.. आपल्या हक्कप्रती जागृत होवून स्वत:चे दोनपैसे खर्च करून मोर्चात सहभागी होण्यास प्रवृत्त झालेला आहे.

*4.* महाराष्ट्रातील बंजारा समाजाच्या 35च्या जवळपास संघटना आहेत  त्यापैकी बहुतांशी संघटनाचे कार्य

आज  दखलपाञ आहे.  परंतू अजूनही अनेक संघटनानी नंगारा मोर्चा संदर्भात आपली भूमिका स्पष्ट मांडलेली नसल्याचे चिञ दिसून येत आहे.  केवळ तोंडी संमर्थनाने काम होणार नाही या संदर्भात

प्रचिती पोहरादेवी येथील राज्यस्तरीय बैठकीमध्ये आलेली आहे.  आज

समाजमन अत्यंत चिंतीत आहे.  आपल्या सर्व संघटना एकाच आईच्या पोटातून (बंजारा समाज) अठराविश्वे दारीद्रयातून जन्माला आल्या आहेत.आम्ही भुतकाळ विसरलो. ती आई (समाज) मोठया संकंटात व दारीद्रयात जीवन आजही व्यतित करीत आहे. व स्वातंञ-काळातही आमच्या यातना अजूनही संपलेल्या नाहीत.  जर आमचा हेतू समाजकल्याणासाठी आहे तर मोर्चातील आमचा सर्वांचा सहभाग समाजासाठी बहुमोल असाच ठरेल.याच भूमिकेतून आमच्या सामाजिक न्यायाचेआमची बाजू भक्कम करण्यासाठी सज्ज व्हावे लागेल.  असे होत नसेल तरआमच्या मनातील गैरसमज प्रवृत्तीस समाज येत्या काळात स्विकारेल का?येनारी पिढी माफ करेल का? निश्चितच  नाही…..

आज काळ बदलतो आहे प्रत्येक समाज संघटीतपणे न्याय हक्कासाठी सजग होत असतांना आम्ही सुध्दा एकसंघपणे आमच्या आपसातील मतभेद दुर करून एक वेळा नागपूर नंगारा मोर्चातून बंजारा समाजमनाला प्रज्वलीत करून एक होवू या.

आमच्या राजकीय नेत्यांनी सक्षमतेने मोर्चात उतरावे.असे न झाल्यास समाजाने त्यांना धडा शिकविण्याची तयार ठेवण्यात हरकत

नसावी.आमच्या सध्याच्या राजकीय नेतृत्वात कुठल्याही स्वरुपाची समाजाप्रती  ऐकवाक्यता नसल्यामुळे समाजाचे अतोनात नुकसान झालेले आहे व  होत आहे. जर नंगारा मोर्चा हा विमूक्त भटक्याच्या न्याय मागण्या संदर्भात आहे.आसा उल्लेख आहे तर तर बंजारा सोडून इतर जातीतला विमूक्त भटक्यांचा आवाज सुध्दा या मोर्चा संदर्भात  कुठे एकाला मिळत नाही.  खरेच उर्वरीत भटक्या जातीच्या संघटनांचे या मोर्चाला कितपत समर्थन मिळते.किती संख्येत ते आपली उपस्थित दर्शवितात   यावरही आमच्या मोर्चांची यशस्वीता अवलबून आहे.  आज समस्त भटक्या विमूक्त कल्याणासाठी काही इतर  संघटना काम करतांना दिसतात. ते कितपत आपल्यासोबत मोर्चात आपली ताकद सिध्द करतात, हे सुध्दा अत्यंत महत्वाचे आहे.  केवळ त्यांच्या स्वार्थासाठी आमच्या बंजारा बांधवांना त्यात गुंफुन ठेवण्याची बाब आम्हांला कितपत योग्य असेल.याचाही उलगडा व्हावा.ते कितपत योग्य ठरेल  असा गैरसमज आमच्यात निर्माण झाला तर वावगे ठरू नये याचाही उलगडा येणाऱ्या  काळात समाजाला निश्चितच दिसेल.  समस्त भटक्या विमुक्ताच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या  हया संघटनांनी आजपर्यंत बंजारा समाजाच्या प्रश्नांसाठी किती आंदोलने केलीत व आवाज उठवला व समाजाला न्याय मिळवून दिला. याचा सुध्दा विचार करावा लागेल.  त्यांच्या कार्यशैली भाष्य न करता सध्यस्थितित  *आपण सर्व मिळून एकजूटपणे,एकत्रित माझ्यासाठी माझा समाज हित मोठे*.  खरे आम्हा  बंजारात मतभेद असले तर मनभेद माञ मूळीच नाही. आम्ही आमच्या न्याय हक्का-

साठी पेटून उठू या.. राजकीय स्वर्थापायी आमचे समाज हित दुर लोटल्या गेल्याचे चिञ अनेक वर्षापासून पाहला मिळते. स्वामी विवेकानंदच्याशब्दात “बल हेच जिवन होय व दुर्बलता हाच मृत्यू.  आता पुरे…  चला आपण सज्ज होवून सर्व मिळून उघडू डोळे ,बघू निट, तरी बांधवांनो, आपल्या एतिहासिक लढयासाठी लाखो संख्येने स्वयंप्रेरनेने मोर्चात सहभागी होवू या.”एकच नारा नंगारा मोर्चा” हे कळकळीचे आवाहन.

????????????????????????????

✍   *प्रा.दिनेश एस.राठोड*

“नंगारा मोर्चा संयोजक समिती”
प्रमुख प्रतिनिधि – गजानन डी. राठोड

चिफ एडीटर – बंजारा न्यूज ऑनलाइन पोर्टल

वेबसाइट – www.goarbanjara.com

भ्रमणध्वनी – 9619401377

One Comment
  1. Avatar

Leave a Reply