बंजारा महिलांबद्दल अश्लील लिखाण केलेल्या भालचंद्र नेमाडे याच्या विरुद्ध आंदोलन करण्यासाठी मा. शंकर पवार (राष्ट्रीय अध्यक्ष AIBSS) यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक

बंजारा महिला शक्तीचा आक्रोश अनेक महिला व संघटनांचे पदाधिकार्याची आज बैठकीला उपस्थिती

ठाणे : दि. 17 जानेवारी 2021 रोजी बंजारा महिलांबद्दल अश्लील लिखाण केलेल्या हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचे विरुद्ध आंदोलन करण्याकरीता समाजातील सर्व संघटना/समितीची ऑल इंडिया बंजारा सेवा संघ मुख्य कार्यालय, संकल्प हाईट्स बिल्डींग, ठाणे (प) येथे मा. शंकर पवार, राष्ट्रीय अध्यक्ष: AIBSS, यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी श्री. हरिभाऊ राठोड: माजी खासदार, श्री. नदुभाऊ पवार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष: BBKD, ऍड.रमेश राठोड, पुणे, श्री.मधुकर जाठोत राष्ट्रीय प्रवक्ता RBP, श्री.सुधीर राठोड, श्री.राकेश जाधव, श्री.सुंदर डांगे, श्री.कांतीलाल राठोड, श्री. सुभाष राठोड, श्री. रमेश चव्हाण, प्रियंकाताई राठोड, इंदूबाई चव्हाण, कोमलताई पवार, व इतर संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.

हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या पुस्तकामध्ये बंजारा महिलांचे झालेल्या अपमानाबद्दल लेखक भालचंद्र नेमाडे यांचा देशभर मोठ्या प्रमाणात तीव्र निषेध होत आहे. याकरीता लवकरच नेमाडे याचे विरुद्ध जन आंदोलन करण्याकरीता पुढील योग्य ती रननीतीची तरतुद करण्याकरीता विचार विनीमय करण्यात आले. सदर बैठकीमध्ये ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे *राष्ट्रीय अध्यक्ष: श्री शंकर एस. पवार* यांनी आपली उपस्थिती नोदवून *बंजारा महिलाशक्ती* अधिक मजबूत होण्याकरीता आपले मत मांडले.

सौजन्य: अनिल राठोड

Leave a Reply