“बंजारा मन- कविता,

बंजारा मन – बंजारा मन
विचार असे तरळतात
जसे कवडसांतील धूलिकण
भटकंती पाहून त्यांची
खिन्न होते माझे मन

विचारांच्या हिंदोळ्यात मिळती
माझे गीत माझे भजन
चाल वेगळी ताल वेगळा
कित्येक रे माझे कवन

उंच उंच झोका जाई
डूंगर खोळा तिज पेराई
आयी दवाळी होळी निराळी
किती वेगळे माझे सन

का? रूसवारे आरशाला
असतील हे जर आभूषण
संत माझा माताही माझी
तरी नसे मी कुलभूषण

प्रश्न पडतात हजार
किती वेगळा माझा गण
किती वेगळे माझे सण
का?….
तरी नसे मी कुलभूषण

:बंजारा साहित्यकार लेखक,
~ प्रा रवींद्र बं. राठोड
   मांढळ,कुही,नागपूर
   9028677020
———–जुडो अन् जोडो—————
सौजन्य:गोर कैलास डी.राठोड
स्वयंसेवक गोर बंजारा संघर्ष समिती भारत,तथा.
Chif Editor Goar Banjara Online News Portal,
Website:www.goarbanjara.com
Contact Mob.9819973477/8652822469

image