बंजारा भटक्या विमुक्त समाजाचा 5 जानेवारी 2015 रोजी मुंबई मंत्रालयावर आझाद मैदान विराट मोर्च्यात सामिल व्हा -प्रकाश राठोड

Prakash Rathod

नांदेड – राष्ट्रीय बंजारा क्रांतीदलाच्या वतीने व राष्ट्रीय भटके विमुक्त महासंघाच्या वतीने 10 डिसेंबर 2014 रोजी नागपुर विधानभवनावर विराट मोर्चा आयोजन करण्यात आले त्यांचा समारोप ही संघर्ष जनजागरण यात्रा नागपूर पासुन मुंबईच्या आझाद मैदानावर याचा समारोप दि. 05 जानेवारी 2015 रोजी होणार असून बंजारा भटक्या विमुक्त समाजाचे प्रश्न जन आंदोलनाच्या माध्यमाने सोडवण्याकरिता या विराट मोर्चात सामिल होण्याचे आवाहन प्रकाश राठोड प्रदेशाध्यक्ष यांनी केले असून या मोर्चाचे नेतृत्व आमदार हरिभाऊ राठोड राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय बंजारा क्रांतीदल व राष्ट्रीय भटके विमुक्त महासंघ व संघर्ष वाहिनी भटके विमुक्त परिषदच्या वतीने करण्यात आले असून या मोर्चाचे निवेदनस्विकारण्या करिता राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस व ना.पंकजाताई पालवे ग्रामविकास मंत्री, ना.राजकुमार बडोले सामाजिक न्याय मंत्री, ना.संजयभाऊ राठोड महसुल राज्यमंत्री, यांना निमंत्रीत करण्यात आले असून आपल्या न्याय हक्काच्या प्रमुख मागण्या सोडविण्याकरिता या मोर्चात मोठय़ा संख्येने बंजारा समाज उपस्थित राहणार आहेत. विमुक्त भटक्याच्या न्याय हक्काच्या मागणीकरीता या मोर्चास मार्गदर्शन करण्याकरिता आमदार हरिभाऊ राठोड, मा.मचिंद्र भोसले हे मान्यवर या मोर्चास मार्गदर्शन करणार आहेत. याकरिता बंजारा भटक्या विमुक्ताच्या कार्यकर्त्यांनी या विराट मोर्चास सामील व्हावे असे आवाहन प्रकाश राठोड प्रदेशाध्यक्ष यांनी कळविले आहे.

श्रोत : बंजारा पुकार

Leave a Reply