बंजारा नव साहित्यिक व उत्तम दर्जाची साहित्य निर्मिती होणार – मा.किसनरावजी राठोड

मुंबई- एक चांगला समाज घडविण्यासाठी, तसेच समाजाच्या  उद्धारासाठी, बंजारा समाजाचा इतिहास घराघरात पोहचावा यासाठी नव साहित्यिक , लेखक, कवी यांनी पुढाकार घेऊन समाज प्रभोधन करावे,तसेच बंजारा भाषेचा वर्चस्व ठेवण्यासाठी बंजारा समाजातील बुध्दीजीवी साहित्यकांनी आपल्या लेखणीच्या जोरावर समाजाचा इतिहास मांडावे.
     आज बघायला गेले तर बंजारा समाज हा आपली संस्कृती,भाषा, वेषभूषा विसरत चाललेला आहे. त्यामुळे समाजाची ओळख कुठे तरी कमी पडत चालली आहे, म्हणून समाज बांधवांनी या गोष्टींची दखल घ्यायला हवी. बंजारा समाजाच्या पेहराव व बंजारा या संस्कृतींवर  चित्रपट सृष्टीत, बंजारा वेषभभूषा व बंजारा शब्दाचा उल्लेख असलेल्या गाण्यांमुळे पूर्ण चित्रपट गाजतो अशी बंजारा संस्कृती असून त्या संस्कृतीचा इतिहास नव साहित्यकांनी आपल्या लेखणीतून मांडावा व बंजारा समाजाला चांगली दिशा मिळावी या हेतूने जास्तीत जास्त साहित्यिक निर्माण व्हावे यासाठी पूर्णपणे योगदान असल्याचे राठोड यांनी स्पष्ट केले. त्यासाठी तांडा – तांड्यावर जाऊन समाजाविषयी माहिती गोळा करून  अभ्यास करणे महत्त्वाचे आहे, तसेच  लिखाण व वाचन या माध्यमातून समाज बांधवांपर्यंत लिहिलेली पुस्तके पोहचवणे हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे.त्यासाठी रामनवमीला होणार्या बंजारा धर्मपीठ व धर्मपरिषदेच्या माध्यमातून २५ पुस्तकांचे प्रकाशन देखील करणार असल्याचे मुंबई येथे झालेल्या साहित्य समन्वयच्या बैठकीत  मा. किसनरावजी राठोड यांनी माहिती दिली आहे.

मुंबई न्यूज , सतिष राठोड
मोबाईल 9579313601
           8976293601

SATISH S RATHOD
             👇🏻
https://m.facebook.com/?hrc=1&refsrc=http%3A%2F%2Fh.facebook.com%2Fhr%2Fr&_rdr