प्रेरणादायी व्यक्तीमत्व श्रावणसींग राठोडः इंदौर

सामाजिक बांधिलकी, समाजऋण, समाजाचा उत्थान ह्या हेतूने प्रेरीत झालेले समाजसेवक श्रावणभाया राठोड संपूर्ण भारतात बंजारा समाजाच्या उद्धारासाठी जातीने हजर राहतात. आमच्या विनंतीला मान देऊन 2012 मध्ये रामनवमी निमित्त उमरी पोहरादेवी येथे संपन्न झालेल्या बंजारा सांस्कृतिक महोत्सवात करतारसिंग तेजावत व आपल्या नातवांना सोबत घेऊन सहभागी झाले होते. 2013 मध्ये नांदेड येथे वधू-वर परीचय मेळाव्यात इंदौर येथील वधू-वरांना सहभागी केले होते. 14 डिसेंबर 2014 ला वाशिम येथील विठ्ठलवाडी मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या राज्यस्तरीय बंजारा उपवर-वधू परिचय मेळाव्यातउद्घाटक म्हणून आपल्या सहकार्यासह उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
Shravansing Rathor indore
वाशिम शहरातील संतसेवालाल संस्थानला भेट देवून सभेला मार्गदर्शन करतांना बंजारा बांधवांना धर्मशाळा बांधण्याची विनंती केली. देशातील गोर बांधवांना समजण्याकरीता आपल्या इंदौर स्थित भव्य-दिव्य हॉटेलचे नाव ‘नवलेरी पॅलेस’ ठेवले आहे. त्यांना हे नाव का दिले? असे विचारले असता ते म्हणाले नवलेरी हा शबद फक्त गोर बोलीतच आहे. एखादा गोरबांधव परराज्यातून गंगवाल बसस्टँड परिसरात आला तर त्याला नवलेरी ह्या शब्दावरुन कळले पाहिजे की, हे हॉटेल आपले आहे. तेथे कोणीही बंजारा बांधव गेल्यास त्यांना माहित होताच त्यांच्या स्वागतासाठी 65 वर्षे वयाचे भाया हजर होतात. इंदौरशहरामधल्या बंजारा बांधवांच्या भेटी घडवतात. त्यांच्या वागण्यातून एकप्रकारची प्रेरणा, नवचैतन्य उर्जा मिळते ते लहान थोरांच्या संपर्कात राहून जणू काही ‘बंजारा जोडा अभियान’ राबवतात. लहान वयाच्या व्यक्तींना भाऊ म्हणून संबोधतात. सतत संपर्कात राहून आपले संबंध दृढ करतात.

आपल्या व्यस्त जिवनातून समाजाला वेळ देत असतात. ते नेहमी सांगतात. मध्यप्रदेश महाराष्ट्राच्या बंजारासह देशभराच्या बंजारा बांधवात एँक्य असले पाहिजे. एकमेकांच्या संपर्कात असलो पाहिजे आंतरराष्ट्रीय सोयरीक संबंध झाले पाहिजे. त्यांनी स्वतः आपल्या कन्येचे लग्न महाराष्ट्रातील किनवट येथे केले आहे. ते नेहमी सांगतात आपल्यातला दुरावा कमी झाला पाहिजे. महाराष्ट्रातील बंजारा बांधवाकद्दल ते नेहमी गौरवउद्गार काढतात ते सांगतात तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला वसंतराव नाईक साहेबांसारखे मुख्यमंत्री मिळाले त्यांच्या प्रेरणेने मोठय़ा प्रमाणात तुमची शैक्षणिक प्रगती झालेली आहे. अनेकांना शैक्षणिक संस्था मिळालेल्या आहेत, अनेक बांधव नोकरीत मोठ मोठय़ा हुद्यावर आहेत, पण उद्योग धंद्याबद्दल ते खंत व्यक्त करतात.

भाया स्वतः बंजारा पुकार साप्ताहिकातून बंजारा पुकार मासिकातून फोन पत्ते घेवून स्वतः फोन करुन चौकशी करतात. माझी ही भेट प्रथम फोनवर झालेली आहे. ते नेहमी फोन करुन इंदौरला येण्याचे निमंत्रण देत असतात. अशा व्यकतीमत्वाची समाजाला गरज आहे. ‘संत सेवालाल महाराज’ यांचे चित्रपट इंदौर येथील बंजारा बांधवांना टॉकीजमध्ये दाखवून त्यांच्या मनात सेवालाल महाराजांविषयी श्रद्धा दृढ केली आहे. आज इंदौरमध्ये बंजारा बांधव एकमेकांना भेटताच ‘जय सेवालाल’ म्हणतात. प्रत्येक व्यक्ती धका-धकीच्या भौतिक जीवनात आपल्या घरस ंसारात मग्न असतांना आपला संसार, व्यापार सांभाळून समाजाला वेळ देतात. समाजाची सेवा करतात. समाजाचे ऋण फेडण्यासाठी धडपड करतात. समाजबांधवांची सेवा घडावी हे स्वप्न उराशी बाळगून श्रावणभायांनी इंदौर येथे आपल्या सर्व सहकार्याच्या मदतीने 30 वर्षापूर्वी घेतलेल्या प्लॉटवर एक भव्य धर्मशाळा बांधण्याचे काम हाती घेतले आहे. बांधकाम अर्धेअधिक पूर्ण झाले असून लवकरच समाजाच्या सेवेसाठी ते पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
भायाच्या कतृत्वाला माझा सलाम.
जय सेवालाल ।

Vilas Rathod
विलास राठोड
अध्यक्ष, ऑ.इं.बं. से.सं. कारंजा
जि. वाशिम
मो. 9423847196

Leave a Reply