प्रशासकीय कामात गैरव्यवहार सात अधिकारी निलंबित

पालकमंत्री संजय राठोडचा जनता दरबार

उमरखेड (प्रतिनिधी) – पालकमंत्र्यांच्या उमरखेड येथील आयोजित जनता दरबारा दरम्यान तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, पं.स.अभियंता, कृषी क्षेत्र सल्लागार, मुख्याध्यापकासह एक ग्रामसेवक अशा एकूण सात जणांवर प्रशासकीय कामात अनियमितता व भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवत महसूल राज्यमंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांना चौकशी करून निलंबनाचे आदेश दिले.
MLA Sanjay Rathod
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या 15 वर्षाच्या राजवटीत आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील विकासकामांना खीळ बसली होती. अशातच मोठय़ा प्रमाणात होत असलेला भ्रष्टाचार व विविध विभागांत नागरिकांना प्रलंबित समस्यांन जणू महापूर आला. याला कायमच निकाली काढण्याकरिता पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्ह्यातील उपविभाग स्तरावर जनता दरबार हा उपक्रम राबविण्याचा निर्णय हाती घेतला. त्या पार्श्वभू ाrवर 5 जून स्थानिक नगर परिषद, मंगल कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. याच माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्याचा धडाका सुरू केला. या जनता दरबारात नागरिकांच्या जवळपास 600 ते 700 तक्रारी वेगवेगळ्या विभागांबाबत दाखल झाल्या होत्या. तर यामध्ये पालकमंत्री संजय राठोड यांनी विभागाच्या प्रमुखांना आसने-सामने होत टप्प्याटप्प्याने तक्रारीच्या सुनावणीस प्रारंभ केला. त्यानुसार सहाय्यक निबंधक कार्यालयापासून सुरूवात करीत सार्वजनिक बांधकाम विभाग, जि.प.बांधकाम, पोलीस ठाणे, नगर परिषद, पंचायत समिती, वन विभाग, लघुपाटबंधारे विभाग, भी अभिलेख, तालुका कृषी विभाग, उर्ध्व पैनगंगा, वीज वितरण, आरोग्य विभाग व शेवट त्यांनीच तहसील कार्यालयाचा लावला तर या सर्व विभागात रखडलेल्या विकास कामांबाबत तथा झालेल्या कामात अनियमितता, भ्रष्टाचाराची पोलखोल करत पालकमंत्र्यांनी अधिकारी व कर्मचार्यांची चांगलीच खरडपट्टी केली.

याच पार्श्वभू ाrवर तालुका कृषी विभागातही फळबाग योजनेअंतर्गत कृषी अधिकारी, क्षेत्र सल्लागार यांनीही कामात अनियमितता व प्रचंड प्रमाणात तक्रारीहून पालकमंत्र्यांनी त्यांचीही चौकशी करून बडतर्फीचे आदेश दिले. तसेच नगर परिषदेअंतर्गत उर्दू कन्या शाळेतील मुली उघडय़ावर शौचास बसत असल्याबाबत शाळेतील होत असलेल्या अंदाधुंद कारभाराप्रकरणी मुख्याध्यापकावर निलंबनाची तर प्रशासन अधिकार्याची तात्काळ बदली करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी न.प.मुख्याधिकार्यांना दिले. यासोबतच मनरेगांतर्गत झालेल्या कामाच्या गडबडीला जबाबदार एका ग्रामसेवकालाही त्यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, जनता दरबाराला उपस्थित अधिकार्यांनी पालकमंत्र्यांच्या या कार्यवाहीने चांगलाच धसका घेतल्यानंतर इतरांची चांगलीच तारांबळ उडाली. याच अनुषंगाने पालकमंत्र्यांनी अधिकार्यांना, कर्मचार्यांना चांगलेच धारेवर धरत त्यांना खडेबोल सुनावत म्हणाले की रखडलेली विकासकामे जनतेच्या प्रलंबित समस्या दिलेल्या वेळेत पूर्ण न झाल्यास त्यांनाही सक्तीने निपटण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. यावेळी व्यासपीठावर खासदार भावनी गवळी, आमदार राजेंद्र नजरधने, राऊत आदिंची उपस्थिती होती.