“प्रमाणिक समाज प्रबोधन करूया,आत्मपरिक्षण करूया”

​”प्रामाणिक समाज प्रबोधन करूया आत्मपरीक्षण करूया” _____________________
 समाज प्रबोधन करत असताना जस जसे या क्षेत्रात कार्य करत असते जस जशी समाजाची प्रगती होण्यासाठी कार्यकर्ता काम करत असतो  तस तसा छुपा विरोध हा वाढू लागतोच; सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा तसा.पण आपल्याला त्याची पुसटशी ही कल्पना नसते.मग तुम्ही केलेली  प्रगती डोळ्यात सलते आणि डोक्यात किडा वळवळूु लागतो तेव्हा कट कारस्थानांच्या बिया पेरल्या जातात. खुरट्या विचारांचे कावळे एकत्र जमू लागतात,समाज द्रोही,ढोंगी, पाखंडी,स्वार्थी,मी पणा चा सोंग घेतलेली व्यक्ती आपणास कमी दाखविण्यासाठी संधी शोधू लागतात.

मग आरोप होतात कधी न दिलेली वर्गणी बाबत  तुमच्यावर आरोप होतात,गैर व्यवस्थापनाचे,गैर कारभाराचे,भ्रष्टाचाराचे,मग तुम्ही भांबवता,हडबडून जाता.कारण हा हल्ला तुम्हाला अनपेक्षित असतो. आणि मग तुम्ही प्रत्युत्तराची तयारी करू लागता.शब्दाला शब्द वाढतात. त्यांची धार तिखट होते.विरोधकांना आयते खाद्य मिळते,आणि नेमका याच क्षणी वाट तुमचे क्षत्रु पाहतात व तुमच्या हातून आजवर न झालेली गफलत (घटना) होऊ शकते. व निराश व्हावे लागते,

त्याचा फायदा हि बांडकुळ मंडळी,घेते व त्यांची एक टोळके तयार होते व समाज हिता विरुद्ध समाजास भडकवतात व ढोंगी पणाने आम्ही यांच्या पेक्षा श्रेस्ट कसे आहोत लबाडीने पटवून देतात त्यात बांडकुळ टोळके समाजाची आहुती देतात आणि स्वार्थ साधून

मोकळे होतात त्यात संपूर्ण  नुकसान फक्त समाजाचे होते.म्हणून आज पर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी समाजाला लाल गाजर दाखवून आपणास लुबाडण्याचेच काम केले आहे.गोर समाजाचे अतोनात नुकसान केले आहे.गोर समाजाच्या ठेकेदाराने विमुक्तां मध्ये फक्त वं बं चा फरक करून आपल्याच प्रतिनिधींनी सर्टिफिकेट दिले आहे.त्या विषयी ब्र शब्द कोणी काढला नाही का नाही काढला…?

कारण हे उच्च पदस्य नेते होते बांडकुळाचे सरदार होते.कोणाची हिम्मत झाली नाही 

ज्यांना आम्ही जबरदस्तीने आमचे जुनी

मंडळी यांना अभिवादन करतो परंतु खरोखर

त्या मंडळीने समाज हिताचे काम केले का…?

माझे उत्तर नाही असेच आहे

कारण जर समाज सुधारण्याचे काम केले असते तर आज गोर बांधव दिशाहीन

झाला नसता,दुसऱ्याच्या दारात कटोरा घेऊन 

आरक्षणाची भीक 7 दशका नंतर ही मागावी लागली नसती,विचार करणे गाम्भिर्याने घेणे आवश्यक होईल.

माझी कळकळ हिच आहे कोणा मागे जाऊ नका, आंदोलन बांडकुळाना घेऊन करू नका…?

सर्व सामान्य विचारवंताना घेऊन करावे

कारण हि माणसे स्व:ताची झोळी भरण्यासाठी आपल्या मागण्यांची होळी करतील

साधे विधान सभेत कधी तोंड उघडायचे नाही.वर समाजाचे नायक म्हणून मिरवतात, 

यांना लाज का वाटत नाही

कधी आपण यांना ओळखू..,? का म्हणून यांना आपला नेता म्हणायचं 

बंधुनो  समाजाची हालत खूप गंभीर करून टाकली आहे, समाज आज पण संघर्ष करतो आहे. उठा जागे व्हा. नाहीतर आपण कधीही जिंकू शकनार नाही.

आपणच आपली मशाल पेटवायला हवी.

किती दिवस वाट बघायची

अंत झाला आता

आमच्या आया बहिणीची अवस्था वेट बिगाराची झाली आहे.त्यांना आशेचे किरण दाखवू या.

गोर बंजाराचे रक्त पाणी होण्या अगोदर

सलसळू देऊ,कारण आता नाही तर कधी नाही हे दिवस याच्या पहिले.

तुम्हावर आरोप प्रत्यारोप होतील डगमगू

नका नाहीतर बांडगुळ तुमच्या मर्गा वर आघात करतील व ना उमेद करतील

चळवळीचे वारे असेच निरंतर वाहू द्या.

यश मिळेल फक्त कागदावर वाघ दाखविण्या ऐवजी रस्त्यावर दाखवा,गोऱ्याना धडा शिकविण्या ऐवजी,सरकार ला धडा शिकवूया,लेटर हेड वर

क्रांती न करता समाजाची उतक्रान्ति करूया,

सेना लढण्यासाठी आहे केवळ बोर्ड लावून शाखा स्थापनेसाठी नाही,चळवळ ग्रुपवर न करता समाजात जाऊन करूया,सामाजिक उत्सव शहरा प्रमाणे खेड्यात बंद झालेली प्रथा परत चालू करुया.

एकोपा करण्याचा प्रयत्न करूया

हे सत्कर्म आपणा कडून घडो हीच कळकळीची विनंती आहे.

हा लेख कृपया कुणीही वैयक्तिक घेऊ नये प्रामाणिक व हाडाचा कार्यकर्ता तयार व्हावे हि प्रामाणिक

इच्छा आहे.

धन्यवाद….

आपलाच समाज शुभ चिंतक,
,,,,,सुखी चव्हाण,बदलापूर

    मोबाईल:-9930051865

गोर कैलास डी.राठोड

आँनलाईन बंजारा न्यूज पोर्टल मुंबई महाराष्ट्र राज्य,

Website:- www.goarbajnjara.com

मोबाईल: 9819973477

Leave a Reply