प्रजासत्ताक दिना निमित्त पिंप्री खुर्द (परशुराम नगर) येथे ग्रामसभा संपन्न
|■ स्वीटहार्ट फाउंडेशनचे संस्थापक पत्रकार श्री. सतिष एस राठोड यांनी ग्रामपंचायतीस जगतगुरु संत श्री सेवालाल महाराज यांची प्रतिमा सप्रेम भेट दिली.
■ माजी सरपंच श्री. गोरखनाथ मल्लू राठोड यांनी ग्रामपंचायतीस बंजारा समाजाचे पहिले मुख्यमंत्री मा. वसंतराव नाईक साहेबांची प्रतिमा सप्रेम भेट दिली.

(श्री. सतिष एस राठोड) ✍
चाळीसगांव :- प्रजासत्ताक दिना निमित्त पिंप्री खुर्द (परशुराम नगर) येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने गावातील विकासाच्या बाबतीत चर्चा करण्यात आली.

सुरुवातीला शासनाच्या आदेशाप्रमाणे ग्रामसभेत तंबाखू व खर्रामुक्त महाराष्ट्र बनविण्यासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली व तंबाखूमुक्त महाराष्ट्रात करण्यासाठी ग्रामस्थांनी संकल्प करावा व तंबाखू, खर्रा कोणीही सेवन करु नये यासाठी परावृत्त करण्यात आले.
तसेच कुष्ठरोग विषयी जनजागृती करण्यात आली. कुष्ठरोगाचे प्रकार व कशा प्रकारे पसरतो याबाबत इयत्ता ८ वी मध्ये शिकणारी गावातील विद्यार्थी कुमारी साक्षी पाटीलने कुष्ठरोग विषयी ग्रामस्थांना माहिती दिली.
■ शासनाने दिलेल्या आदेशा प्रमाणे पिंप्री खुर्द (परशुराम नगर) येथील अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थांच्या नावांची यादीचे वाचन करण्यात आले.
■ कर वसुली करण्या संबंधी चर्चा करण्यात आली तसेच ग्रामस्थांनी लवकरात लवकर घर पट्टी, पाणी पट्टी भरुन ग्रामपंचायतीला सहकार्य करण्यात यावा असे स्पष्ट करण्यात आले. व गावातील इतर विकास कामाच्या बाबतीत चर्चा देखील करण्यात आली.
ग्रामसभेच्या अध्यक्ष स्थानी पत्रकार सतिष एस राठोड हे होते. तसेच ग्रामसेवक विकास सोनवणे, नाना देवरे, सुनिल कोष्ठी, प्रकाश राठोड, महेंद्र राजपूत, सरपंच सौ. सुनिताबाई प्रकाश राठोड, ईश्वर राठोड, दिनेश पवार, सिध्दार्थ मोरे, ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामस्थ उपस्थित होते.
I want to be a participant on this website