प्रकाशित एका वृत्तांनुसार450 बंजारा कुटुंबे धम॔परिवत॔न

मित्रांनो, आजच्या दैनिक लोकसत्ता मध्ये प्रकाशित एका वृत्तांनुसार450 बंजारा कुटुंबे धम॔परिवत॔न करून बौद्ध धर्म स्वीकारीत असल्याचे म्हटले आहे.ही अत्यंत धक्कादायक बाब आहे,कृपया आपापल्या विभागात ,उपविभागात याबाबत तातडीने चौकशी करा व त्यांचे मतपरिवर्तन करा.आपली बंजारा संस्कृती ही जगातील सर्वात श्रेष्ठ सिंधूसंस्कृती आहे त्यामुळे आपण आजही बंजारा म्हणून श्रेष्ठ आहोत ,आज तर हळूहळू आपण जागे होऊन आपले हक्क अधिकार याबाबत बोलू लागलो असतांनी आपल्या लोकसंख्येस प्रचंड महत्त्व आले आहे अशावेळी आपण कोणत्याही कारणाने अल्पसंख्य होणे अत्यंत धोक्याचे आहे कृपया हे समजून घ्या व याबाबत जास्तीत जास्त तांडयापय॔त हा संदेश पोहोचवा शक्य असेल तेथपर्यंत आपल्या संघटनेचे पदाधिकारी म्हणून आपण पोहोचा किंवा पत्रक काढून त्यांच्या पय॔त पोहोचवा.याबाबत संघटनेकडून सविस्तर मार्गदर्शन करणारे पत्रक लगेच काढण्यात येणार असून आवश्यक असेल अशा ठिकाणी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी भेट देऊन समाज बांधवांचे मन वळविण्याचा प्रयास करतील,तत्पूर्वी कृपया या बातमीची सत्यता पडताळून पाहा व कोणत्याही भागात असे घडत असल्याचे कळल्या बरोबर तात्काळ संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांना माहिती धा . कृपया या कामाला प्रथम प्राधान्य द्या व सतत संपर्कात रहा,जागृत रहा काळ कठीण आहे,कठीण परीक्षेची वेळ आहे. आम्ही  संत सेवालालचे वंशज आहोत आम्ही कोणत्याही संकटाला न घाबरणारे आहोत ,अशा अनेक संकटातून आम्ही निश्चितच बाहेर पडू फक्त आपले प्रयास प्रामाणिक असावे अशी माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे .अमर राठोड